Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Crisis : सांगलीत सहा तालुक्यांतील ३७ मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर

Drought Condition : सांगली जिल्ह्यात एकूण ६८ मंडल आहेत. आधी कडेगाव, मिरज, शिराळा, खानापूर-विटा या चार तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर केला होता.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात जत, आटपाडी, तासगाव आणि कवठेमहांकाळ हे तीन तालुके वगळता इतर तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आले होते. राज्य शासनाने उर्वरित सहा तालुक्यांतील ३७ मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

त्यामुळे मध्यम दुष्काळी भागात ६५ मंडलाचा समावेश झाला आहे. नेहमी दुष्काळी असणारे तालुके दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे चित्र आहे.

सांगली जिल्ह्यात एकूण ६८ मंडल आहेत. आधी कडेगाव, मिरज, शिराळा, खानापूर-विटा या चार तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर केला होता. जत आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगाव या तालुक्यांना दुष्काळातून वगळण्यात आले होते. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली होती.

वाळवा आणि पलूस हे दोन तालुके नदीकाठावर असल्याने तेथे पाऊस कमी झाला असला तरी टंचाईची दाहकता असत नाही. त्यामुळे त्या तालुक्यातून दुष्काळाबाबत फारशी आग्रही मागणी दिसत नव्हती. परंतु दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून व्यक्त होत आहे.

परंतु आता राज्य शासनाने मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून तेथे सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे राज्य शासनाने नव्याने जाहीर केलेल्या यादीत सांगली जिल्ह्यातील आणखी ३७ मंडलांचा समावेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ६५ मंडल आता मध्यम दुष्काळी ठरणार आहेत. आधी जाहीर केलेल्या मध्यम दुष्काळी तालुक्यांमध्ये टंचाईच्या सवलती जाहीर करण्यात आले आहेत.

नव्याने दुष्काळसदृश समाविष्ट मंडले

तालुका मंडल नावे संख्या

कवठेमहांकाळ ढालगाव, देशिंग, कुची, कवठेमहांकाळ, हिंगणगाव ५

वाळवा वाळवा, कोरेगाव, कुरळूप, तांदुळवाडी, ताकारी, पेठ, कासेगाव, बहे, आष्टा, इस्लामपूर, कामेरी ११

जत संख, माडग्याळ, जत, मुचंडी, डफळापूर, कुंभारी, उमदी, शेगाव ८

तासगाव मांजर्डे, विसापूर, येळवी, मणेराजुरी, सावळज, तासगाव ६

पलूस कुंडल, पलूस, भिलवडी, अंकलखोप ४

आटपाडी दिघंची, खरसुंडी, आटपाडी ३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT