Drought Crisis : सोलापुरातील आणखी ६ मंडलांचा दुष्काळ यादीत समावेश

Drought Update : सोलापूर जिल्ह्यातील ४० मंडलांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला होता. त्यात आणखी सहा मंडलांचा समावेश करण्यात आला आहे.
Drought Crisis
Drought CrisisAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील ४० मंडलांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला होता. त्यात आणखी सहा मंडलांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी मंडलांची संख्या ४६ पर्यंत पोहोचली आहे. या गावांना सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. .

नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपतग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडलांमध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळून आले आहे.

Drought Crisis
Drought Crisis : खर्चाला पैसा नाही, दावणीची जनावरं विकण्याची वेळ

त्यानुसार मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे कमी पर्जन्यमान झालेल्या २०६८ महसुली मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून तेथे सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण आता नव्याने आणखी १०२१ मंडलांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

या मंडलात सोलापूर जिल्ह्यातील ४० मंडलांमध्ये आणखी ६ मंडलांचा समावेश करण्यात आला. उत्तर सोलापूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील मंडलांचा त्यात समावेश आहे.

Drought Crisis
Drought Crisis : दुष्काळामुळे सणासुदीसाठी चैतन्य उरलं नाही

...या सवलती होणार लागू

 जमीन महसुलात सूट मिळणार, बँक कर्जाचे पुनर्गठन होणार

 शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती मिळणार

 कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट मिळणार

 शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी मिळणार

 रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता देणार

 आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर करणार.

 शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही.

दुष्काळ जाहीर झालेली ४६ मंडले

उत्तर सोलापूर ः शेळगी, तिऱ्हे, मार्डी, वडाळा, सोलापूर

दक्षिण सोलापूर ः बोरामणी, वळसंग, मंद्रूप, होटगी, मुस्ती, निंबर्गी, विंचूर

अक्कलकोट ः अक्कलकोट, जेऊर, तडवळ, करजगी, दुधनी, मैंदर्गी, वागदरी, चपळगाव, किणी

मोहोळ ः मोहोळ, कामती बु, टाकळी सिकंदर, पेनूर, वाघोली, नरखेड, सावळेश्वर, शेटफळ, माढा- मोडनिंब

पंढरपूर ः पंढरपूर, भंडीशेगाव, भाळवणी , करकंब, पटवर्धनकुरोली, पुळुज, चळे, तुंगत, कासेगाव

मंगळवेढा ः बोराळे, मरवडे, आंधळगाव, मारापुर. मंगळवेढा, भोसे, हुलजंती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com