Drought Crisis : सातारा जिल्ह्यातील ७४ मंडलांत दुष्काळ जाहीर

Drought Update : दुष्काळ जाहीर केलेल्या यादी जिल्ह्यातील ९१ पैकी ७४ मंडलांचा दुष्काळात समावेश झाला आहे.
Drought Crisis
Drought CrisisAgrowon
Published on
Updated on

Satara News : सातारा: दुष्काळ जाहीर केलेल्या यादी जिल्ह्यातील ९१ पैकी ७४ मंडलांचा दुष्काळात समावेश झाला आहे. १७ मंडले वगळता उर्वरित मंडलांचा दुष्काळाच्या यादीत समावेश झाल्याने येथील शेतकऱ्यांना आता दुष्काळाच्या सवलती मिळणार आहेत.

जिल्ह्यातील केवळ वाई व खंडाळा तालुक्यांचा समावेश झाला होता. त्यानंतर दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांतून संतापाचा लाट उसळली. येथील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या उर्वरित तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली.

Drought Crisis
Drought Crisis : खर्चाला पैसा नाही, दावणीची जनावरं विकण्याची वेळ

मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. त्यानुसार ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या मंडलांत दुष्काळ जाहीर केला. जिल्ह्यातील ७४ मंडलांत दुष्काळ जाहीर झाला आहे, तर १७ मंडलांत दुष्काळी जाहीर झालेला नाही.

दुष्काळ जाहीर झालेली तालुकानिहाय मंडले

सातारा : सातारा, खेड, वर्ये, कण्हेर, शेंद्रे, नागठाणे, अंबवडे, वडूथ, तासगाव, अपशिंगे

जावळी : आनेवाडी, कुडाळ

पाटण : म्हावशी, मरळी, ढेबेवाडी, चाफळ, तारळे, मल्हारपेठ, तळमावले, कुटरे

कऱ्हाड : कऱ्हाड, उंब्रज, इंदोली, सुपने, मसूर, कवठे, कोपडे-हवेली, शेणोली, कोळे, काले, मलकापूर

कोरेगाव : कोरेगाव, कुमठे, रहिमतपूर, शिरंबे, वाठार स्टेशन, वाठार किरोली, पिंपोडे, सातारा ड, किन्हई

खटाव : खटाव, पुसेगाव, वडूज, पुसेसावळी, मायणी, निमसोड, कातरखटाव

Drought Crisis
Drought Crisis : दुष्काळामुळे सणासुदीसाठी चैतन्य उरलं नाही

माण : दहिवडी, मलवडी, गोंदवले, म्हसवड, मार्डी, शिंगणापूर

फलटण : फलटण, आसू, होळ, गिरवी, आदर्की, वाठार, बरड, तरडगाव

खंडाळा : खंडाळा, वाठार, लोणंद

वाई : पाचवड, वाई, भुईंज, ओझर्डे, सुरूर

महाबळेश्वर : पाचगणी, तापोळा, लामज

दुष्काळात न बसणारी मंडले

सातारा : दहिवड, परळी. जावळी : जावळी, बामणोली, करहर, केळघर. पाटण : पाटण, हेळवाक, मोरगिरी. कऱ्हाड : उंडाळे. खटाव : औंध, बुध. माण : कुकुडवाड. खंडाळा : शिरवळ. वाई : पसरणी, धोम. महाबळेश्वर : महाबळेश्वर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com