Solapur News : केंद्र शासनामार्फत शहरी भागातील जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी करून अद्ययावत व अधिक अचूक नकाशे तयार करण्याचा ‘नक्शा’(NAKSHA) उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
त्यात प्रथदर्शी प्रकल्प म्हणून पंढरपूर नगरपालिकेची निवड करण्यात आली असून, नगर परिषद हद्दीतील सर्व मिळकतींचे सविस्तर नगर भूमापन करून व चौकशी करून मिळकतींचे नकाशे व मिळकत पत्रिका या प्रकल्पातंर्गत तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके यांनी दिली.
पथदर्शी नक्शा प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच पंढरपूर येथे करण्यात आला. या वेळी तहसीलदार सचिन लंगुटे, उपअधीक्षक भूमी अभिलेख पूजा आवताडे, उपमुख्याधिकारी ॲड. सुनील वाळूजकर, नगर अभियंता नेताजी पवार, क्रेडाई अध्यक्ष अमित शिरगावकर, भूमी अभिलेख विभागाचे नवनाथ राऊत, विकास कुमठेकर, शिवदास शितोळे, प्रवीण ननवरे, मयूर पुजारी उपस्थित होते.
या वेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख घोडके म्हणाले, की पंढरपूर शहरी भागातील जमीन मोजणी करून मालमत्ता कार्ड देण्याबाबत ‘नक्शा’(NAKSHA) हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यात १० नगरपालिका क्षेत्रामध्ये हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येत आहे.
त्यात आपल्या जिल्ह्यातील पंढरपूर नगरपालिकेचा समावेश आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या क्षेत्राच्या भागातील मालमत्तांचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण केले जाईल. त्याद्वारे प्रत्येक मालमत्तेचे अचूक नकाशे तयार करून मालमत्ताधारकास दिले जातील.
शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर रचना विभागाच्या नकाशांशी तसेच भूमी अभिलेख विभागाच्या नकाशांशी एकसूत्रता असणे अत्यंत महत्त्वाचे असून. शहरी भागातील बांधकाम परवाने योग्य पद्धतीने हाताळणे आणि मिळकत कराची योग्य आकारणी करण्यासाठी, ड्रोन सर्व्हेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जागेचा अचूक आणि भूसंदर्भीय नकाशा तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.