आळेफाटा : ‘‘बोरी बुद्रुक गावाने ड्रोनद्वारे मोजणीचा (Land Survey By Drone) ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तो भूषणावह आहे. यामुळे हद्दी कायम होऊन आपआपल्यामधील वाद कायमस्वरूपी मिटतील आणि उभ्या महाराष्ट्रात बोरी पॅटर्नच (Bori Pattern Of Land Survey) नाव घेतले जाईल,’’ असे प्रतिपादन आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी काढले.
महसूल व शेतीच्या वादावरील असंख्य तक्रारी व न्यायनिवाडे प्रलंबित असून, वर्षानुवर्षे त्याचा निकालही लागत नाही. यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील शेतजमीन मोजणी समितीने सन २०१७ मध्ये याबाबत एक योजना आराखडा तयार करून गावातील शेतकऱ्यांसमोर मांडला.
स्मार्ट व्हिलेज प्रकल्प अंतर्गत गावातील शेतजमीन मोजणी करण्याची संकल्पना पुढे आणली. याचा प्रारंभ तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, माजी सरपंच पुष्पा कोरडे, सुनील जाधव, गणेश औटी, कोमल कोरडे, तबाजी शिंदे, गाव तलाठी शीतल गर्जे, रंजन जाधव, युवराज कोरडे, भूमिअभिलेखचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद
ऊस उत्पादन घेणारे बोरी गाव असल्यामुळे वाढलेल्या उसामुळे मोजणीमध्ये अडचणी येऊ लागल्या. यावर भूमिअभिलेख व समिती यांच्यात एक बैठक झाली व यासाठी काय गरजेचे आहे याबाबत शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून पुढील मोजणी कशा पद्धतीने केली जाईल याबाबतची माहिती व नियोजन देण्यात आले. शेतकऱ्याने आपल्या शेतात वहिवाटीनुसार खुणा उभारण्याचे आव्हान केले होते. शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.