Drone Pilot Training agrowon
ॲग्रो विशेष

Drone Pilot Training: दापोली कृषी विद्यापीठात ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र मंजूर

Drone Pilot Center: कृषी विद्यापीठात स्थापन झालेले महाराष्ट्रातील लहान आणि मध्यम वर्गातील हे ड्रोन चालविणारे पहिले प्रशिक्षण केंद्र आहे.

Team Agrowon

Dapoli News: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास नवी दिल्ली येथील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मान्यता दिली आहे. कृषी विद्यापीठात स्थापन झालेले महाराष्ट्रातील लहान आणि मध्यम वर्गातील हे ड्रोन चालविणारे पहिले प्रशिक्षण केंद्र आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या वतीने संचालक आणि सहायक संचालक यांनी विद्यापीठाला भेट देऊन ड्रोन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सोयीसुविधांची तपासणी करून त्याचा अहवाल महासंचालनालयाला सादर करण्यात आला.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आणि संचालक डॉ. पराग हळदणकर आणि डॉ. सतीश नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा निर्माण केल्या असून लवकरच प्रशिक्षण सुरू होणार आहे, असे वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्राचे प्रभारी आणि प्रकल्प प्रमुख डॉ. संतोष सावर्डेकर यांनी सांगितले. यासाठी पीबीसी एरोहा पुणे यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला असून, प्रशिक्षण केंद्र संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण केंद्रामार्फत कोकणातील आणि अन्य भागांतील तरुणांना ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण देऊन ड्रोन उडविण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयामार्फत परवाना देण्यात येणार आहे. त्यातून रोजगार निर्मितीचे नवीन दालन उपलब्ध होणार आहे.

प्रशिक्षणासाठी १८ ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्ती, तसेच किमान शैक्षणिक अर्हता १० वी पास असल्यास त्यांना १ आठवड्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण सशुल्क असून, त्याची नोंदणी विद्यापीठस्तरावर तसेच सारथी, बार्टी या संस्थेकडे नोंदणी केल्यास त्यांच्याकडून प्रशिक्षण शुल्क आणि आर्थिक साह्य प्राप्त होईल, अशी माहिती डॉ. सावर्डेकर यांनी दिली.

खर्चाची होणार बचत

कोकणातील आंबा, काजू, नारळ आणि इतर पिकांवरती कीटकनाशके, बुरशीनाशके तसेच विद्राव्य खतांच्या फवारणीसाठी ड्रोनचा उपयोग केला जाणार आहे. ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे कीटकनाशकांची आणि खतांची परिणामकारकता वाढणार असून शेतकऱ्यांची, फवारणीसाठी होणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT