Somnath
Somanath Agrowon

Drone Expert : दहावी शिकलेल्या सोमिनाथची ‘ड्रोन’वर हुकूमत

Drone Technology : समस्याग्रस्त शेतीमध्ये प्रगतीच्या वाटा शोधण्यासाठी तरुण शेतकरी कृषिपूरक व्यवसायात जिद्दीने कसे पाय रोवतात, याचे उत्तम उदाहरण म्हणून सोमिनाथ सुधाकर अवघड याचे नाव मराठवाड्यात घेतले जात आहे.
Published on

Chhatrapati Sambhajinagar News : समस्याग्रस्त शेतीमध्ये प्रगतीच्या वाटा शोधण्यासाठी तरुण शेतकरी कृषिपूरक व्यवसायात जिद्दीने कसे पाय रोवतात, याचे उत्तम उदाहरण म्हणून सोमिनाथ सुधाकर अवघड याचे नाव मराठवाड्यात घेतले जात आहे. दहावी शिकलेला ‘सोमिनाथ’ने आता प्रयोगशील शेतीसोबतच ड्रोन आधारित व्यवसायात जम बसवला आहे.

जालना जिल्ह्यातील बदनापूरच्या वाकुळणी गावाचा सोमिनाथ एक पट्टीचा ड्रोनचालक बनला आहे. त्याचा प्रवास दुःखाचा, कष्टाचा आहे. २००१ मध्ये सोमिनाथ दहावीत व त्याचा भाऊ सातवीत असतानाच वडिलांचे निधन झाले. पितृछत्र हरपल्याने सारी जबाबदारी सोमिनाथवर आली. तोट्यातील शेती सांभाळत असताना जोडधंदा म्हणून २०११ मध्ये त्याने ट्रॉलीसह ट्रॅक्टर घेतला व तो ऊस वाहतूकदार बनला. परंतु तोडणी मजूर उचल घेऊन पळाल्याने सोमिनाथचे चार लाख रुपये बुडाले. शेवटी त्याला ट्रॉली विकाव्या लागल्या, हे संकट असताना दुसऱ्याच वर्षी दुष्काळ पडून सोमिनाथची मोसंबी बागही जळाली.

Somnath
Agriculture Drone Purchase : ड्रोन खरेदीसाठी मिळणार अर्थसाह्य अर्ज करण्याचे आवाहन

अनेक समस्या असतानाही सोमिनाथ हरला नाही. त्याने समूह शेतीकडे मोर्चा वळवला. सोमिनाथ व त्याच्या शेतकरी मित्रांनी एकत्र येत हरितक्रांती फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी स्थापन केली. ‘हरितक्रांती’चा संचालक बनलेल्या सोमिनाथने आपण केवळ सूचना करणारे नेतृत्व म्हणून गावात काम करणार नसल्याचे मनाशी ठरवून टाकले. केवळ मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहून श्रमापासून दूर जाण्याची पळवाटदेखील त्याने नाकारली. शेतीपूरक व्यवसाय अंगीकारण्यासाठी सोमिनाथने ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण घेण्याचा संकल्प केला.

Somnath
Drone Technology : ड्रोन तंत्रज्ञान योजनेस अल्प प्रतिसाद; अनुदानासाठी अल्प अर्ज

‘‘आम्हा शेतकऱ्यांना गावाकडे तंत्रशुद्ध पद्धतीने साधी मोटारगाडी शिकण्याची देखील सोय नसते. त्यामुळे ड्रोनसारखे तंत्रज्ञान माहिती करून घेणे किंवा प्रत्यक्ष चालविण्याची विद्या शिकणे मला अवघड वाटत होते. मी प्रशिक्षण वर्गाला प्रवेशदेखील घेतला. परंतु प्रत्यक्षात बरीचशी माहिती इंग्रजीत होती. इंग्रजी भाषेचा व माझा आधीच छत्तीसचा आकडा असल्याने मी ड्रोनचालक होईल, असे मला अजिबात वाटत नव्हते. तरीही अनेक अडचणींवर मात करीत मी ड्रोनचे प्रशिक्षण पूर्ण केले.

आता मी उत्तम ड्रोन चालवतो. आतापर्यंत १४०० एकरवर ड्रोनद्वारे फवारणी केल्याचा अनुभव मला मिळाला आहे,’’ असे सोमिनाथ आनंदाने सांगतो. ड्रोनपाठोपाठ तोट्यातील शेतीवर देखील सोमिनाथने नियंत्रण मिळवले आहे. तो आता प्रगतिशील कापूस उत्पादक शेतकरी बनला आहे. एकरी २० क्विंटलपर्यंत कपाशी उत्पादनाचे तंत्र त्याने अवगत केले आहे. जालना जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये तसेच ड्रोनद्वारे आधुनिक शेती करणाऱ्या समूहांमध्ये आता सोमिनाथचे (संपर्क ९९२२६१६५२३) नाव सन्मानाने घेतले जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com