कबड्डीची पंढरी अशी राज्यात ओळख मिळवलेले गाव म्हणून बेलखेड (जि. अकोला) चे नाव घेतले जाते. सात दशकांपासून येथे कबड्डीची परंपरा अभिमानाने जोपासली जात आहे. गावाने असंख्य खेळाडू घडवले. राज्यासह राष्ट्रीय स्तरावर बेलखेडचे नाव पोचले. याच खेळाने तरुणांत जीवनशैली, शिस्त, नियमित सराव, संघभावना, प्रतिस्पर्ध्यांचा आदर ही मूल्ये रुजवली. तर गावात सामाजिक एकात्मता, आरोग्यदायी जीवनशैली आणि परस्पर सहकार्याची भावना विकसित केली. .अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात वसलेले सुमारे १५ हजार लोकसंख्येचे बेलखेड गाव आहे. शेती, शिक्षण, सामाजिक, राजकारण आदी क्षेत्रात गावाने प्रगती केली आहे. पण गावाची खरी ओळख आहे ती महाराष्ट्राची ‘कबड्डीची पंढरी’ म्हणूनच. सन १९५२ हे वर्ष बेलखेडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल. त्या काळात गावातील काही तरुणांनी कबड्डीचा खेळ अंगीकारला. शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि संघभावना या मूल्यांनी प्रेरित होऊन तो रुजवला. काळ पुढे सरकत गेला तसतसा कबड्डी हा बेलखेडच्या तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भागच झाला. त्या काळात प्रशिक्षणासाठी कोणत्या सोयीसुविधा नव्हत्या. मैदान मातीचे होते. परंतु जिद्द, आवड यांच्या जोरावर येथील तरूणांनी कबड्डीत भक्कम स्थान निर्माण केले. आज सात दशके उलटली. कबड्डीची परंपरा गावाने प्राणपणाने जोपासली आहे. संध्याकाळ होताच गावातील शाळेच्या मैदानावर कबड्डीचे सूर उमटायला सुरवात होते..Sports Experts: क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचना धोरणात परावर्तित होतील.पिढ्यानपिढ्या जपलेला वारसा बेलखेड गावात आज कबड्डी केवळ खेळ राहिलेला नाही. तो संस्कार, अभिमान झाला आहे. त्याने वेगळी जीवनशैली, शिस्त, नियमित सराव, संघभावना, प्रतिस्पर्ध्यांचा आदर ही मूल्ये रुजवली आहेत. काही कुटुंबातील आजोबा, वडील आणि नातू अशा तिन्ही पिढ्या या खेळात आहेत. (कै.) मुरलीधर खुमकर, रामरतन खुमकर (दादाभाऊ), बालमुकुंद खुमकर, गौरव खुमकर अशी कुटुंबातील नावे पुढे येतात. शाह परिवारात मकसूदशाह, त्यांचे भाऊ अफजल शाह, राजीक शाह, साजिद शाह, जावेद शाह अशा खेळाडूंनी मैदान गाजवले आहे. त्यांचा वारसा जुनैद अफजल शाह, बंधू फरहान शाह चालवत आहेत. जुनैद संघाचे व्यवस्थापक असून फरहान राज्याच्या संघाचे नेतृत्व करीत आहेत. फरहान यांनी विदर्भाच्या संघाचेही नेतृत्व केले. सातवेळा सुवर्ण पदके जिंकली. विद्यापीठ गोल्ड हा मान पटकावला. त्यांच्यासारखे अनेकजण बेलखेडचे नाव कबड्डीत उज्ज्वल करीत आहेत. .एकसे बढकर एक संघआजवर गावात ३०० ते ४०० कबड्डीपटू घडले. पैकी अनेकांनी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये बेलखेडचे प्रतिनिधित्व केले आहे. काहींनी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. बेलखेडचा प्रत्येक युवक कबड्डीचा खेळाडू होणे हे अभिमानाचे स्थान मानतो. या खेळाने गावातील काहींचे नोकरीचे दरवाजे उघडले. कुणी पोलिस खात्यात, कुणी एसटी महामंडळात तर कुणी महावितरण व अन्य विभागात दाखल झाले. गावात दर्यावती, जयहिंद, नेताजी, नवयुवक असे एकसे बढकर एक कबड्डी संघ तयार झाले. आज जय हनुमान कबड्डी, शिक्षण, व्यायाम बहुउद्देशीय संस्था हा वारसा पुढे नेत आहे. .या मंडळाचे अध्यक्ष संतोष ठाकूर, सचिव अशोक ऊर्फ बंडूभाऊ खुमकर आहेत. तर संचालकपदी सत्यशील सावरकर, श्रीकृष्ण खुमकर, गजानन देशमुख, देवेश ठाकूर व विनोद खुमकर ही मंडळी कार्यरत आहेत. दररोज रात्री गावात कबड्डीचा सराव सुरु असतो. लहान, किशोरवयीन, युवक असे सगळे मैदानात उतरतात. गावातील ज्येष्ठ खेळाडू प्रशिक्षक असतात. आधुनिक प्रशिक्षण साधनांचा अभाव असला तरी ज्येष्ठांचा अनुभव, त्यातून आलेले मार्गदर्शन व रोजचा सराव यातून खेळाडू चांगल्या पद्धतीने घडत आहेत. परिसरातील सर्व स्पर्धांमध्ये बेलखेडचा संघ विजेत्यांच्या यादीत अग्रस्थानावर असतो. केवळ ताकद महत्त्वाची नाही. तर तांत्रिकदृष्ट्या व कौशल्यानेही खेळाडू परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करतात. ‘रेडर’ आणि ‘डिफेंडर’ दोन्ही भूमिकांमध्ये ते निपुण आहेत. हा मातीचाही गुण म्हणायला हवा..सामाजिक, सांस्कृतिक प्रभावकबड्डीतून गावात सामाजिक एकात्मता, आरोग्यदायी जीवनशैली आणि परस्पर सहकार्याची भावना विकसित झाली आहे. स्पर्धा काळात संपूर्ण गाव एकत्र येते. गावात होणाऱ्या धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात नागरिक एकोप्याने काम करतात. या खेळामुळे गावातील तरुणांनी मद्यपान, धूम्रपान आदी कोणत्याही व्यसनांपासून व सवयींपासून दूर राहण्याचा मार्ग स्वीकारला आहे..Union Sports Ministry : क्रीडा मंत्रालयाचा कुस्तीचा डाव; भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यासह नवे अध्यक्ष संजय सिंग चितपट.शासकीय पाठबळाची गरजकबड्डीचे पंढरी म्हणून जरी पुढे आले असले तरी अद्याप गावाला शासकीय स्तरावर पुरेशा सुविधा नाहीत. योग्य मैदान, प्रकाश व्यवस्था, आधुनिक प्रशिक्षण साहित्य, मार्गदर्शन यांची गरज आहे. शासकीय पाठबळ मिळाल्यास बेलखेड देशाच्या नकाशावर सुवर्ण अक्षरांनी नोंदवले जाऊ शकते असा विश्वास इथले जुने खेळाडू व्यक्त करतात. आज कबड्डी संघ हा विजेतेपदाच्या रकमेतून खर्च भागवतो. मात्र दीर्घकालीन प्रगतीसाठी राज्य क्रीडा विभागाने लक्ष घालणे आवश्यक आहे. बेलखेडने अनेक गावांना प्रेरणा दिली आहे. तरुणपिढी मोबाईल, सोशल मीडियामध्ये गुंतली असताना बेलखेडमधील तरुण मात्र रात्री मैदानावर सराव करीत असल्याचे चित्र निश्चितच प्रेरणादायी आहे..शेतरस्त्यांच्या समस्यासुमारे पंधराहजारांपर्यंत गावची लोकसंख्या आहे. कपाशी, सोयाबीन तूर, हरभरा, गहू यांच्यासह केळी, संत्रा, कांदा अशी पिके गावात घेतली जातात. गावात एक- दोन नव्हे तर असंख्य शेतरस्त्यांच्या समस्याही आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणीही केली आहे..आमच्या गावाला कबड्डीमुळे ओळख मिळाली. अनेक चांगले खेळाडू तयार केले. तरुण पिढी खेळात रमलेली पाहायला मिळते. या खेळाला प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. गावशिवारातील पाणंद रस्ते, पाऊलवाटा मोकळ्या व्हाव्यात यासाठी तहसीलदारांकडे मागणी केली आहे. त्याचाही शासनस्तरावर विचार व्हायला हवा.सत्यशील सावरकर ९८८१६४६०३४ (माजी उपसरपंच तथा संचालक, ‘हनुमान’ संस्था).सन १९८० मध्ये गावात दर्यावती किसान कबड्डी संघ स्थापन झाला. सन २००८ पर्यंत हा संघ विविध स्पर्धा खेळला. बक्षिसे जिंकली. सन २००८ याच वर्षी जय हनुमान क्रीडा मंडळ स्थापन केला. तेव्हापासून नियमितपणे स्पर्धा आयोजन, सराव शिबिर घेणे, विदर्भ तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अधिकाधिक दर्जेदार कबड्डीपटू तयार करण्याचे कार्य सुरु आहे.अशोक खुमकर ( बंडूभाऊ)९८२२७१६२६२ (माजी कबड्डीपटू तथा मार्गदर्शक, बेलखेड).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.