Irrigation Subsidy Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Subsidy : ‘ठिबक, तुषार सिंचन योजनेचे थकित अनुदान तत्काळ द्या’

Farmer Demands : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून २०२२- २३ व २३- २४ या वर्षातील ८००० शेतकऱ्यांचे ठिबक तुषार सिंचन योजनेचे थकित अनुदान अंदाजे २५ कोटी रुपये तत्काळ वितरित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Team Agrowon

Beed News : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून २०२२- २३ व २३- २४ या वर्षातील ८००० शेतकऱ्यांचे ठिबक तुषार सिंचन योजनेचे थकित अनुदान अंदाजे २५ कोटी रुपये तत्काळ वितरित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी शेतकरी क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी (ता. ९) आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

या वेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. त्यानुसार बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून २०२२- २३ व २३ - २४ या वर्षात त्यांच्या शेतात ठिबक सिंचन व तुषार संच बसविले.

दोन वर्षांपासून बीड जिल्ह्यातील तब्बल ८ हजार शेतकऱ्यांचे अंदाजे २५ कोटी रुपये ठिबक व तुषार सिंचन अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही मिळाले नाही. वारंवार विनंती करून देखील शासनाने अनुदान वर्ग केले नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले.

यातील बऱ्याच पात्र शेतकऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केल्या. तरीही शासनाने गांभीर्याने घेतले नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनावर शेतकरी क्रांती मोर्चाचे अध्यक्ष कुलदीप करपे, जिल्हाध्यक्ष आनंद ढाकणे, कार्याध्यक्ष शरद इंगळे, उद्धव साबळे, लहू गायकवाड, आकाश चौरे, अतुल गवळी, अभिजित लोमटे, श्रीकृष्ण चाटे, बाबासाहेब काकडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT