Dharashiv News : राज्य शासन रोज नवीन योजनांची घोषणा करीत आहे. परंतु मार्च अखेर मिळणारे तुषार व ठिबकचे कळंब तालुक्यात चार कोटी, तर जिल्ह्यात सोळा कोटींचे अनुदान चार महिने उलटले तरी शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
शासन मुख्यमंत्री लाडकी बहीण, तसेच लाडका भाऊ अशा विविध योजनांची घोषणा करून लोकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, शेतकरी वर्गाकडे दुर्लक्ष होत आहे. लोकसभेला शेतकरी नाराजीचा महायुतीला फटका बसला होता तरी देखील शासन शेतकऱ्यांना समाधानी करताना दिसत नाही.
धाराशिव जिल्ह्यात वर्ष २०२० पासून २०२३ पर्यंत खरीप विमा भरलेल्या शेतकऱ्यांना अद्याप सर्व मंडळांतील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा रक्कम मिळाली नाही. शेतीमालातील सोयाबीन, कांदा या प्रमुख पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. यातच भरीस भर म्हणून मार्च अखेर मिळणारे ठिबक तुषारचे अनुदान मार्च संपून चार महिने उलटले तरी अद्याप धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले नाही.
मार्च अखेर पैसे देऊ, असे म्हणून दुकानदारांकडून उधारीवर घेतलेले तुषार ठिबकचे पैसे दुकानदारांना शेतकरी देऊ शकले नाहीत. एकीकडे शासन नवनवीन घोषणा करीत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी देण्यात येणारे अनुदान अद्याप का मिळाले नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.