Sangli News : येथील डॉ. ओंकार कुलकर्णी यांच्या शोधप्रबंधाची दखल ‘नेचर केमिकल बायोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय जर्नलने घेतली आहे. डॉ. कुलकर्णी यांचा शोधप्रबंध या जर्नलने प्रसिद्ध केला आहे. वनस्पती व सूक्ष्मजीव यांच्यामधील रासायनिक संवादाचा शोध त्यांच्या संशोधक चमूने लावला आहे.
‘डिस्कव्हरी ऑफ नोव्हेल रुट व्होलाटाईल सिग्नलिंग लिडिंग टू होस्ट बेनिफिशियल कॉम्प्लेक्स बायोफिल्म्स’ असे या शोधप्रबंधाचे शिर्षक आहे. अन्नाची वाढती मागणी आणि शेतीचा पर्यावरणावर होणारा परिणाम ही दोन मोठी आव्हाने आहेत.
त्यांना सामोरे जाण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने अन्न पुरवठा वाढविणे गरजेचे आहे. मातीमधील सूक्ष्मजीव वनस्पतीच्या वाढीस चालना देतात. त्यादृष्टीने या प्रबंधात संशोधन करण्यात आले आहे.
या शोधामुळे भविष्यात रासायनिक खतांचा वापर कमी होईल. तसेच पीक उत्पादन साधारणपणे ३० टक्क्याने वाढू शकते. हाही मोठा फायदा शेतीमध्ये होवू शकतो, असा दावा या प्रबंधाद्वारे करण्यात आला आहे.
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयुएस) च्या जैवविज्ञान विभागाअंतर्गत डॉ. कुलकर्णी यांनी हे संशोधन केले. या प्रबंधाला ‘सिंगापूर सेंटर फॉर एन्व्हॉयर्नमेंटल लाइफ सायन्सेस इंजिनिअरिंग (सेल्सी) आणि सिंगापूर विद्यापीठाने अनुदान दिले आहे.
डॉ. कुलकर्णी सध्या सिंगापूर येथे सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीत संशोधन आणि विकास विभागात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉ. कुलकर्णी यांनी आयसीटी मुंबई येथून बी. फार्म ही पदवी घेतली आहे.
तर सिंगापूर येथील विद्यापीठाने त्यांना पीएचडी प्रदान केली आहे. डॉ. कुलकर्णी हे मे.बी. जी. चितळे डेअरीचे (भिलवडी) सरव्यवस्थापक शशिकांत कुलकर्णी यांचे सुपुत्र आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.