Agriculture Research : मुळांच्या शोषणावर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रथिनांचा लागला शोध

Researchers at the University of Nottingham : नॉटिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांनी वनस्पतीच्या मुळामध्ये असलेल्या प्रथिनाचा शोध लावला आहे. हे प्रथिन जमिनीतून पाणी आणि अन्नद्रव्यांच्या शोषणावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.
Agriculture Research
Agriculture ResearchAgrowon
Published on
Updated on

Discovered a Protein found in the Root of a Plant : नॉटिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांनी वनस्पतीच्या मुळामध्ये असलेल्या प्रथिनाचा शोध लावला आहे. हे प्रथिन जमिनीतून पाणी आणि अन्नद्रव्यांच्या शोषणावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. या संशोधनामुळे पर्यावरणातील विविध परिस्थितींना तोंड देण्याची क्षमता असलेले व कमी पाणी आणि खतांचा वापर करूनही अधिक उत्पादनक्षम असे पिकांचे वाण विकसित करण्यात मदत होईल, असा दावा संशोधकांनी केला. हे संशोधन ‘सायन्स डायरेक्ट’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

वनस्पतींची मुळे ही जमिनीतून पाणी आणि अन्नद्रव्ये शोषण्याचे काम करतात. त्याच प्रमाणे वनस्पतींचा उभे राहण्याच्या दृष्टीने आधार व संतुलन पुरविण्याचे काम करतात. हे सर्व संतुलन मुळांच्या सर्वांत आतील एका थराच्या स्नायूद्वारे होते, त्याला इंडोडर्मिस असे म्हणतात.

Agriculture Research
Agriculture Research : शेतकऱ्यांच्या समस्यांवर संशोधन गरजेचे

या इंडोडर्मिसच्या पेशींमध्ये लिग्नीनयुक्त घटकांनी बनलेला एक अडथळा असून, तो द्रव आणि पाण्याच्या हालचालीवर मर्यादा आणतो. त्यामुळे वनस्पतींच्या मुळांमध्ये अनावश्यक घटकांना आत येण्यास मज्जाव केला जातो. याचाच दुसरा अर्थ वनस्पतीच्या आतमध्ये कोणते घटक घ्यावयाचे किंवा सोडून द्यायचे याचे पेशीय नियंत्रण ही वाहक प्रथिने (dirigent proteins) घेतात.

या संशोधनामध्ये वनस्पतींच्या आंतरमुळांमध्ये तयार होणाऱ्या लिग्निनयुक्त घटकांचे नियंत्रण करणाऱ्या या वाहक प्रथिनांची ओळख पटविण्यात नॉटिंगहॅम विद्यापीठातील जैवशास्त्र विद्यालयाची शास्त्रज्ञ डॉ. गॅब्रियल कॅस्ट्रिल्लो व सहकाऱ्यांना यश आले आहे. लिग्निनयुक्त घटकांच्या नियंत्रणातून जमिनीतून नेमकी कोणती व किती अन्नद्रव्ये उचलायची याचे संतुलन साधले जाते.

Agriculture Research
Paddy Research : दापोलीच्या कृषी विद्यापीठाचा ‘भात संशोधन संस्थे’शी करार

जागतिक तापमान वाढ आणि अनियमित पर्जन्यमानाचे संकट वाढत असताना या दोन्ही स्थितीमध्ये स्वतःची चांगल्या प्रकारे वाढ करण्याची क्षमता असलेल्या पिकांच्या जाती विकसित करण्यावर आपल्याला भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी वनस्पतीतील वेगवेगळ्या यंत्रणा नेमक्या कशा प्रकारे चालतात, याविषयी अधिक ज्ञान मिळवत राहण्याची आवश्यकता आहे.

या संशोधनातून मुळांच्या अन्नद्रव्य आणि पाणी शोषण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या घटकांची ओळख पटविली आहे. या प्रथिनांमुळेच वनस्पती संतुलित अन्नद्रव्ये शोषण करू शकतात. भविष्यात जनुक अभियांत्रिकीद्वारे नव्या वाणांचा विकास करण्याच्या प्रक्रियेमध्ये हे संशोधन अत्यंत मोलाचे ठरणार आहे.
- डॉ. गॅब्रियल कॅस्ट्रिल्लो, जैवशास्त्र विद्यालय, नॉटिंगहॅम विद्यापीठ, संयुक्त ब्रिटन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com