Organic Carbon Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Carbon : हवामान बदलामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होतो का?

Soil Health : सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत चालल्याने जमिनीची सुपीकता कमी होऊन, जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मात प्रतिकूल बदल होणे असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत.

Team Agrowon

Climate Change : सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत चालल्याने जमिनीची सुपीकता कमी होऊन, जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मात प्रतिकूल बदल होणे असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. हवामान बदलामुळेही जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होऊ शकते.

हवामान बदलाचे जमिनीतील सेंद्रिय कर्बावर होणारा परिणाम

हवामान बदलामुळे होणारी तापमान वाढ आणि ओझोन थरात झालेल्या घटीमुळे भूपृष्टावर पडणारी अतिनील किरणे यामुळे जमिनीचे तापमान वाढल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचा विघटनाचा वेग वाढतो, परिणामी जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी होऊन सुपीकता कमी होते. शेतामधील ऊस पाचट, काडीकचरा, भाताचे तूस जाळण्याच्या परंपरेमुळे सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी होत आहे.

हवामानाच्या जास्त आणि कमी अशा पावसाच्या दोनही बाबींचा जमिनीच्या सुपिकतेवर निरनिराळा प्रभाव असतो. कमी पाऊस आणि अवर्षण यामुळे सेंद्रिय ऱ्हास होतो. जास्त कर्बाचे विघटन होऊन त्याचा ऱ्हास होतो. जास्त पावसाच्या परिस्थितीतही सेंद्रिय कर्ब मातीच्या कणांना चिकटवून पाण्यासोबत वाहून जातो.

सक्रिय कर्ब हा पिकांच्या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी व सूक्ष्म जिवाणूंच्या वाढीसाठी, ह्युमिक कर्ब जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यासाठी तसेच निष्क्रीय कर्ब जमिनीचे तापमान वाढविण्यासाठी आवश्यक असतात. जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणूंना सेंद्रिय पदार्थाद्वारे ऊर्जा पुरविली जाते, त्यामुळे त्यांची कार्यक्षमता चांगली होऊन अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवली जाते.

बदलत्या हवामान परिस्थितीत सेंद्रिय कर्बाचे संवर्धन

कमीत कमी नांगरट करावी. जमिनीची धूप बांधबंदिस्ती द्वारे कमी करावी.

पिकांच्या अवशेषाचे आच्छादन म्हणून वापर. उदा.खोडवा उसात पाचटाचे नियोजन, अवर्षण प्रवण भागात ज्वारी पिकात तुरकाठ्या, बाजरी सरमाडाचे आच्छादन.

जमिनीची पूर्वमशागत करताना कुळवाच्या शेवटच्या पाळी अगोदर शिफारसी प्रमाणे सेंद्रिय, कंपोस्टचा वापर करावा.

जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचा प्रमाण वाढविण्यासाठी कमीत कमी कमी तीन वर्षातून एकदा ताग, धैंचा यासारखी पिके घेऊन पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावीत.

अॅझोटोबॅक्टर, रायझोबियम, स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धकाचा वापर करावा. यांचा वापर बीजप्रक्रिया तसेच शेणखतात मिसळून वापर करावा.

पिकांच्या फेरपलटीत कडधान्यवर्गीय पिके आलटून पालटून घ्यावीत.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करावा. खतांची मात्रा संतुलित, योग्य वेळी, योग्य प्रकारे द्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Election: प्रचारात झालेल्या खर्चाची भरपाई द्या

Crop Loan: पीककर्ज वितरणाची गती मंदावली

Agriculture Technology: इक्रिसॅटचे तंत्रज्ञान कृषी विद्यापीठात राबवू

Rabi Crop Insurance: रब्बी हंगामातही पीकविम्याला प्रतिसाद कमीच

Sury Project Canal: सूर्या डावा तीर कालव्याच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह

SCROLL FOR NEXT