Organic Carbon : जमिनीतील सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा?

बदलत्या हवामानामुळे आणि पीक उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते आणि पाण्याचा अमर्याद वापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली.
Organic Carbon
Organic CarbonAgrowon

जमिनीची सुपीकता (Soil Fertility) कमी होत चालल्याने केवळ पिकांचं उत्पादनच नव्हे, तर उत्पादकता आणि गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. त्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं (Organic Carbon) प्रमाण वाढवणं आवश्‍यक आहे. सेंद्रिय कर्ब हे सूक्ष्मजीवांचे अन्न आहे.

जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर अवलंबून असतं. मात्र बदलत्या हवामानामुळे आणि पीक उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते (Chemical Fertilizers) आणि पाण्याचा अमर्याद वापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली.

अशा परिस्थितीत सेंद्रिय कर्बाच संवर्धन करण आवश्यक झालं आहे. सेंद्रिय कर्ब वाढीसाठी कोणते उपाय योजावेत याविषय़ी महात्मा फुले कृषीविद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. 

जमिनीची कमीत कमी नांगरट करावी. जमिनीची धूप बांधबंदिस्ती द्वारे कमी करावी.

पिकांच्या अवशेषाचा आच्छादन म्हणून वापर करावा. यामध्ये खोडवा उसात पाचटाचे नियोजन, अवर्षण प्रवण भागात ज्वारी पिकात तुरकाठ्या, बाजरी सरमाडाचे आच्छादन यासारख्या उपायांचा समावेश होतो. 

Organic Carbon
Organic Carbon : सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उपाययोजना

जमिनीची पूर्वमशागत करताना कुळवाच्या शेवटच्या पाळी अगोदर शिफारशी प्रमाणे सेंद्रिय आणि कंपोस्ट खताचा वापर करावा.

जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचा प्रमाण वाढविण्यासाठी कमीत कमी कमी तीन वर्षातून एकदा ताग, धैंचा यासारखी पिके घेऊन पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावीत.

अॅझोटोबॅक्टर, रायझोबियम, स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धकाचा वापर बीजप्रक्रिया तसचं शेणखतात मिसळून करावा.

पिकांच्या फेरपालटीत कडधान्यवर्गीय पिके आलटून पालटून घ्यावीत.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करताना खतांची मात्रा संतुलित, योग्य वेळी, योग्य प्रकारे द्यावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com