Fertilizer Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

DAP Fertilizer : ‘डीएपी’साठी आग्रह नको; पर्यायी खताचा वापर करा

Fertilizer Shortage : खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) खतावरच अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Team Agrowon

Latur News : खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) खतावरच अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

महाराष्ट्र हे मृद्‍ परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणालीसाठी अग्रेसर आहे. राज्यामध्ये सध्या पेरणीला सुरुवात झाली असून, डीएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. डीएपी खतामध्ये १८ टक्के नत्र, तर ४६ टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत.

या स्थितीत डीएपी खताची कमतरता भरून काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरदयुक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशांतर्गत तयार होत असून, यामध्ये स्फुरद १६ टक्क्यांसह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात.

सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डीएपी खताच्या एका गोणीऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डीएपी खतास चांगला पर्याय आहे. एसएसपी बरोबरच एनपीके - १०:२६:२६, एनपीके - २०:२०:०:१३, एनपीके - १२:३२:१६ व एनपीके - १५:१५:१५ या संयुक्त खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्यसुद्धा पिकांना उपलब्ध होते.

त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर पिकांसाठी पोषक ठरतो. त्याचबरोबर टीएसपी (ट्रिपल सुपर फॉस्फेट) या खतामध्ये ४६ टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असून, डीएपी खताच्या एका गोणीऐवजी युरिया अर्धी गोणी व टीएसपी एक गोणी खतांचा वापर डीएपीला पर्याय म्हणून करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT