Soybean Procurement Process Agrowon
ॲग्रो विशेष

MSP Procurement : सोयाबीनची खरेदी हमीदरापेक्षा कमीने नको

Soybean MSP : शेतीमालाची नियमबाह्य खरेदी करणाऱ्या खरेदीदार व्यापारी, अडत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Team Agrowon

Satara News : व्यापाऱ्यांनी सोयाबीनची खरेदी ही ४८९२ रुपये प्रतिक्विंटल या शासनाने निश्चित जाहीर केलेल्या आधारभूत दरापेक्षा (एमएसपी) कमी दराने करू नये, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने दिला आहे. दरम्यान, व्यापारी वर्गाने आपल्या व्यापार परवान्याचे तातडीने नूतनीकरण करून घ्यावे, अशी नोटीसही कृषी बाजार समितीने बजावलेली आहे.

कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट परवानाधारक व्यापाऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. पांडुरंग भोसले व सचिव संताजी यादव यांनी एक नोटीस काढली आहे. त्यात म्हटले आहे, की कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ नियम १९६७ च्या कलम ३२ ड अन्वये किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतीमालाची खरेदी करण्यास प्रतिबंध करून त्यावरती उपाययोजना करण्याचे अधिकार बाजार समितीस आहेत.

तेव्हा आपण सोयाबीनची खरेदी ही आधारभूत प्रतिक्विंटल ४८९२ रुपये दरापेक्षा कमी दराने करू नये, तसेच शेतीमाल खरेदीनंतर बाजार समितीची अधिकृत काटापट्टी, शेतकरीपट्टी देणे अपेक्षित आहे.

शेतीमालाची नियमबाह्य खरेदी करणाऱ्या खरेदीदार व्यापारी, अडत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दरम्यान हमीदरापेक्षाही कमी दर मिळत असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

शेतकरी अडचणीत असल्याचे पाहून काही व्यापारी सोयाबीन खरेदी आधारभूत दरापेक्षा कमी दराने करत असल्याच्या तक्रारी आहेत. व्यापाऱ्यांनी हे थांबवून किमान आधारभूत दराने किंवा त्यापेक्षा जादा दराने सोयाबीन खरेदी करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिलेला आहे.
- ॲड. पांडुरंग भोसले, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT