Atul Bhujal Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Atal Bhujal Yojana : अटल भूजल यंत्रणेची जिल्हास्तरीय कार्यशाळा

भूजलाच्या शाश्वत विकासाकरिता जिल्हा व ग्राम पातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे. सुक्ष्म सिंचन पध्दतीचा अधिकाधिक अवलंब करून उपलब्ध पाण्याचा वापर मर्यादित करणे.

Team Agrowon

Nagpur News : अटल भूजल योजनेंतर्गत संलग्न विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा जागतिक बँक व केंद्र शासन, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेस भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. वर्षा माने, प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाच्या सहायक भूवैज्ञानिक घोडेस्वार, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सहाय्यक भुवैज्ञानिक डॉ. रेखा बोधनकर, कनिष्ठ भूवैज्ञानिक नंदकिशोर बोरकर, कनिष्ट भूवैज्ञानिक तुषार गोटे, भौगोलिक माहिती प्रणालीतज्ज्ञ बाबा भासारकर, जल संवर्धनतज्ज्ञ दर्शन दुरबुडे, कृषितज्ज्ञ प्रतीक हेडाऊ, माहिती शिक्षण संवादतज्ज्ञ नीलेश खंडारे, ममता बालपांडे उपस्थित होते.

अटल भूजल योजनेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या सदस्य सचिव तथा वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. वर्षा माने यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सांगितले, की भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे होत असलेली भूजल पातळीतील घसरण थांबविण्याकरिता केंद्र शासन व जागतिक बँक यांचे पुरस्कृत अटल भूजल (अटल जल) योजना राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.

योजना पूर्णतः केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत असून प्रकल्प क्षेत्रातील गावांमध्ये मागणी आधारित (पाणी बचतीच्या उपाययोजना) कामे व पुरवठा आधारित (जलसंधारण पुनर्भरण उपाययोजना) वेगवेगळया विभागाच्या जसे की मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, जलसंधारण, रोहयो आदी योजनेद्वारे अभिसरण असणार आहे.

भूजलाच्या शाश्वत विकासाकरिता जिल्हा व ग्राम पातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे. सुक्ष्म सिंचन पध्दतीचा अधिकाधिक अवलंब करून उपलब्ध पाण्याचा वापर मर्यादित करणे.

सिंचन व्यवस्थापनामध्ये सुधारणा आणणे व सर्व बागायती क्षेत्रात १०० टक्के ठिबक व तुषार सिंचनाखाली आणणे आदी विषयांची माहितीही सादरीकरणाद्वारे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT