Atal Bhujal Yojana : अटल भूजलद्वारे होणार जलसुरक्षा नियोजनाचा कार्यक्रम

भूजल पातळी वाढविण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बँक अर्थसाह्यित पुरस्कृत अटल भूजल योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.
Atul Bhujal Yojana
Atul Bhujal YojanaAgrowon

Satara News : गेल्या काही वर्षांत भूजल पातळी (Ground Water Level) दिवसेंदिवस खालावत आहे. याचा कृषीसह सर्वच घटकांवर विपरीत परिणाम होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर भूजलच्या व्यवस्थापनासाठी (Ground Water Management) भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील माण, खटाव, वाई व महाबळेश्‍वर तालुक्यांत अटल भूजल योजनेच्या माध्यमातून जल सुरक्षा (Water Security) नियोजन (वॉटर सिक्युरिटी प्लॅनिंग) सुरू आहे. या ठिकाणी भूजल पातळी वाढीसाठी जलसंधारण, मृदासंधारणासह विविध कामे केली जाणार आहे.

भूजल पातळी वाढविण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बँक अर्थसाह्यित पुरस्कृत अटल भूजल योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. यात जिल्ह्यातील माण तालुक्यातील ३६ गावे, खटाव तालुका ३२, वाई तालुक्यातील ४३, तर महाबळेश्‍वर तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे.

Atul Bhujal Yojana
Atal Bhujal Yojana : भूजल जनजागृतीसाठी राज्यात अटल भूजल पंधरवडा सुरु

या योजनेच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात अटल भूजल पंधरवडा घेतला होता. दरम्यान, मागणी व पुरवठा व्यवस्थापन सूत्राचा अवलंब करून भूजल साठ्यात शाश्‍वतता आणणे, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अधिक अवलंब करून उपलब्ध भूजलाचा वापर मर्यादित करणे, राज्यातील अशोषित, शोषित आणि अशत: शोषित पाणलोटातील गावांची प्राधान्याने निवड करणे, लोकसहभागातून स्थानिक पातळीवर नियोजन करणे, जलसंधारणासह भूजल पुनर्भरणाच्या कामांना प्राधान्य देणे यांसह विविध उद्दिष्टे अटल योजनेत आहेत.

दरम्यान, जल सुरक्षा नियोजनात पहिल्या टप्प्यात पूर्वतयारीचा व मूलभूत संकलनाचा टप्पा, दुसऱ्या टप्प्यात जलसुरक्षा आराखडे करणे, तिसऱ्या टप्प्यात आराखड्यांची अंमलबजावणी करणे, तर चौथ्या टप्प्यात भूजलाच्या शाश्‍वत व्यवस्थापनासाठी कामे करणे अशा पद्धतीचे नियोजन आहे.

Atul Bhujal Yojana
Atul Bhujal Yojana : ‘अटल भूजल’ पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम

ही कामे होणार...

सांडपाणी व्यवस्थापन, जलशोषक चरे, कोरडवाहू फळबाग लागवड, सूक्ष्म सिंचन, कमी पाण्यावर येणाऱ्या वाणाची निवड, सिमेंटचा नाला बांध घालणे, विंधन विहिरीऐवजी साध्या विहिरींवर भर, पिकांना पाणी देताना पहाटे अथवा सायंकाळी देणे, गावातील सर्व नळांना तोट्या बसविणे यांसारखी कामे अटल भूजल योजनेत असल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाने सांगितले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com