Saurabh Katiyar Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road : लोकवर्गणीतील पाणंद रस्त्याने घातली जिल्हाधिकाऱ्यांना भुरळ

Farm Road Encroachment : शासनाच्या कोणत्याही विभागावर अवलंबून न राहता चौसाळा ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पाणंद रस्ता आणि पाण्याच्या डोहाचे काम करण्याचा निर्णय घेतला आणि अल्पावधीतच हे काम पूर्णत्वासही गेले.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हणतात त्यामुळेच शासनाच्या कोणत्याही विभागावर अवलंबून न राहता चौसाळा ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पाणंद रस्ता आणि पाण्याच्या डोहाचे काम करण्याचा निर्णय घेतला आणि अल्पावधीतच हे काम पूर्णत्वासही गेले. हा चर्चेचा विषय झाल्यानंतर खुद्द जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची पावले या गावाकडे वळली आणि त्यांनी ग्रामस्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

अंजनगावसूर्जी तालुक्‍यातील चौसाळा परिसर हा फळपिकांसाठी प्रसिद्ध आहे. संत्र्यासोबतच सीताफळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील या भागात मोठी आहे. परंतु चौसाळा ते तुरखेड या पाणंद रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने या भागातून मुख्य रस्त्यापर्यंत फळांची वाहतूक करणे जिकरीचे ठरत होते.

त्याच्या परिणामी बागायतदारांना त्यांच्या शेतमालाचा परतावा देखील कमी मिळत होता. ही बाब लक्षात घेता गावातील हर्षद काळमेघ, उपसरपंच मंगेश ढोरे यांनी लोकवर्गणीतून पाणंद रस्ता व पाण्याचे डोह निर्माण करण्याचा निर्णय घेतला. चौसाळा ते तुरखेड रस्त्यावरील १०९ शेतकऱ्यांनी यासाठी वर्गणी दिली. त्यामाध्यमातून चार लाख ३७ हजार रुपये गोळा झाले.

त्यातून साडे तीन किलोमीटर रस्ता तयार करण्यात आला. त्यासोबतच शिंगमोडी नदीपात्रातून साहित्य काढण्यात आले. त्याचा वापर रस्त्यासाठी करण्यात आला. यामुळे नदीपात्रात २१ लाख लिटर जल संकलीत होतील असे डोह तयार केले. १२० मिटर लांब, १३ मिटर रुंद, आणि ९ फुट उंच असे खोलीकरण या कामातून झाले. एकूण वर्गणीपैकी ४ लाख २० हजार रुपयात काम झाले त्यामुळे २२ हजार रुपये शिल्लक आहेत.

रस्त्यामुळे मिळाला दर

पाणंद रस्ता केलेल्या भागात संत्रा ६८ हेक्‍टर असून रस्त्यामुळे संत्रा बागायतदारांना वाढीव दर मिळाला तर श्‍याम दखणे या सीताफळ उत्पादकाची बाग गेल्या हंगामात २० हजार रुपयात विकली गेली. यंदा त्यांना १ लाख ४१ हजार रुपये मिळाले.

पाणंद रस्ते कामात वापरलेल्या नदीपात्रातील साहित्याची पुण्यातील प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासण्यात आली. त्याआधारे भार वहनक्षमता १० टन आहे. संपूर्ण तांत्रिक बाबी तपासत हा रस्ता करण्यात आला. शासनाचा पाणंद रस्त्यावरील खर्च ३० लाख रुपये प्रति किलोमीटर आहे. आम्ही मात्र चार लाख २० हजार रुपयांत साडेतीन किलोमीटर रस्ता केला.
हर्षद काळमेघ, चौसाळा, अंजनगावसुर्जी, अमरावती

जिल्हाधिकाऱ्यांकडून सहकार्याची ग्वाही ‘ॲग्रोवन’ने ७ मे २०२३ रोजी या कामाविषयीचे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची पावले आपसूकच गावाकडे वळली. तब्बल पाऊण तास त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. अशाप्रकारच्या लोकाभिमुख कामासाठी प्रशासन सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Insurance 2025 : रब्बी हंगामातही पिक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ; १० नोव्हेंबरपर्यत ८ हजार ३७९ शेतकऱ्यांचे अर्ज

Onion Price: कांद्याचे भाव घसरले, शेतकऱ्याने हताश होऊन उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

US Election 2025: अमेरिकेतील निवडणुकांचे निकाल काय सांगतात?

Cotton Farmer Issue: कापूस उत्पादकांची चहूबाजूंनी कोंडी

Bihar Election 2025: राज्यातील लढतीचे ‘केंद्रीय’ पैलू

SCROLL FOR NEXT