Ashadhi Wari Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2025 : पालखी मार्गावर सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे काटेकोर निर्देश

Palakhi Sohala 2025 : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी व जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज पालखी तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक पायी चालत येतात.

Team Agrowon

Pandharpur News : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी व जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज पालखी तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक पायी चालत येतात. सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा व पालखी तळांवर तसेच रिगंण सोहळ्याच्या ठिकाणची सर्व कामे संबंधित विभागाने समन्वय साधून २५ जूनपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिल्या.

आषाढी यात्रेच्या अनुषंगाने केबीपी कॉलेज, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पागांरकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, भीमा पाटबंधारे कार्यकारी अभियंता श्री. हरसुरे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशिर्वाद म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गावर वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी व पालखी सोहळ्याच्या वाहतूक मार्गात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन व संबंधित विभागाने सुचविलेले कामे तत्काळ करून घ्यावीत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बैठकीत पालखी मार्ग, तळ तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी वारकरी भाविकांना सुविधा उपलब्धतेसाठी सर्व संबंधित विभागाच्या अडचणी जाणून घेऊन, ज्या विभागाची मदत लागणार त्यांना तत्काळ जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आवश्यक सूचना दिल्या.

नदीची पाणीपातळी योग्य राहील

भीमा पाटबंधारे विभागाने चंद्रभागा नदीपात्रात पाणीपातळी बाबतचे माहिती फलक लावावेत. उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामुळे उजनी धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस वाढत आहे. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी संबंधित विभागाशी चर्चा करून योग्य नियोजन करण्यात येईल. तसेच वीर धरणातील पाणी सोडण्याबाबतही चर्चा करण्यात करून चंद्रभागा नदी पात्रात योग्य प्रमाणात पाणी पातळी राहील, याबाबत नियोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT