Distribution of materials to polling stations Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Khadakwasla Constituency : बारामती लोकसभा मतदार संघांतर्गत खडकवासला विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांना मतदानासाठीच्या साहित्याचे वितरण सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय आसवले यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव बुद्रुक येथील स्प्रिंग डेल स्कूलच्या मैदानात करण्यात आले.

Team Agrowon

Pune News : बारामती लोकसभा मतदार संघांतर्गत खडकवासला विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांना मतदानासाठीच्या साहित्याचे वितरण सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय आसवले यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव बुद्रुक येथील स्प्रिंग डेल स्कूलच्या मैदानात सोमवारी (ता. ६) करण्यात आले.

बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान ७ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. निवडणूक साहित्याचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार असून स्वीकृतीचे कामही वडगाव बुद्रुक येथील स्प्रिंग डेल स्कूलच्या मैदानात होणार आहे. साहित्य वाटप करण्याकरिता व स्वीकृतीसाठी १०० कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे.

साहित्य वाटपासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून ५३ टेबलद्वारे मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप कामकाजाला सुरुवात केली. नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन मतदान केंद्राचे साहित्य मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित मतदान अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबतची नोंद साहित्य वाटप नोंदवहीत घेण्यात आली.

मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य तसेच मतदान प्रक्रियेविषयीचे विविध पाकिटे आणि लिफाफे आदी साहित्य सुपूर्द करण्यात आले.

या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ३८ हजार ३१ मतदार असून ५१५ मतदार केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी सुमारे ३ हजार १९१ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. साहित्य घेऊन जाणाऱ्या प्रत्येक बसला पोलीस बंदोबस्त असून जीपीएस प्रणाली अद्ययावत ठेवली आहे. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी सुमारे १०० पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT