Lok Sabha Election : मतदानासाठी पाच हजार बॅलेट युनिट तयार ः डुडी

Election Update : सातारा लोकसभा मतदार संघात येत्या सात मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे.
Elections
Electionsagrowon

Satara News : सातारा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी विधानसभेच्या सहा मतदार संघांसाठी निवडणूक आयोगाकडून पाच हजार ६५४ बॅलेट युनिट, तीन हजार ३३९ कंट्रोल युनिट व तीन हजार ४३१ व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले आहेत.

ही सर्व मतदान यंत्रे मतदानाकरिता सुस्थितीत तयार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, दुर्गम भागात जाण्यासाठी बोटींची सुविधा उपलब्ध केली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

Elections
Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

सातारा लोकसभा मतदार संघात येत्या सात मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. निवडणूक कामकाजासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने ११ हजार १५५ इतके मनुष्यबळ निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केले आहे.

Elections
Baramati Lok Sabha Election : नणंद की भावजय, कोण मारणार बाजी

कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशिन हाताळण्याच्या प्रशिक्षणासह निवडणूक कामकाजाबाबत आवश्यक ते सर्व प्रशिक्षण दोन वेळा देण्यात आले आहे. तिसरे प्रशिक्षण सहा मे रोजी होणार आहे. मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मिनी बस ३९, एसटी बस ४२६, दुर्गम मतदान केंद्रासाठी दोन बोट देण्यात आलेल्या आहेत.

निवडणुकीमध्ये आवश्यक असणारे सर्व साहित्य विविध शासकीय मुद्रणालय यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. इंटरनेट कमी क्षमतेने उपलब्ध असलेल्या भागात ३१ मतदान केंद्रे असून, या ठिकाणी संपर्क होण्यासाठी वॉकीटॉकी व रनर या मार्गाने संपर्क करण्याचे नियोजन केले आहे, असे श्री. डुडी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com