Baramati Lok Sabha Election : नणंद की भावजय, कोण मारणार बाजी

Supriya Sule Sunetra Pawar : गेल्या अनेक वर्षांपासून बारामती तालुक्याची दुष्काळी ही ओळख पुसून टाकण्यात शरद पवार आणि अजित पवार यांना यश आले आहे.
Supriya Sule Sunetra Pawar
Supriya Sule Sunetra PawarAgrowon
Published on
Updated on

Baramati News : बारामती लोकसभा मतदारसंघात प्रथमच शरद पवार यांचे कुटुंबच समोरासमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे ही लढत देशात लक्षवेधी ठरत आहे. मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (नणंद) आणि सुनेत्रा पवार (भावजय) अशी लढत होत होत असली तरी खरी लढत ही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच आहे. या लढतीत विकास आणि निष्ठा हे प्रचाराचे मुद्दे ठरत आहेत. या ठिकाणी ७ मे रोजी मतदान होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बारामती तालुक्याची दुष्काळी ही ओळख पुसून टाकण्यात शरद पवार आणि अजित पवार यांना यश आले आहे. तालुक्यातील अत्याधुनिक कृषी विकासाच्या संस्थांचे जाळे आणि शिक्षण संस्थांसह कृषी संशोधनाच्या राष्ट्रीय संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य यामुळे बारामती तालुका नावारूपाला आला आहे.

मात्र तालुक्याच्‍या ग्रामिण भागात अद्यापही पाण्याच्या समस्या कायम आहेत. काही भाग दुष्काळी आहे. हा मुद्दा सध्या प्रचारात गाजत असून, पाणी योजनांसाठी निधी मिळविण्यासाठी आणि विकासासाठी अजित पवार मते मागत आहेत.

Supriya Sule Sunetra Pawar
Baramati Lok Sabha : आता शिवतारे-अजित पवार यांची दोस्ती पाहा : शिवतारे

बारामतीसह इंदापूर, दौंड, पुरंदर, भोरमध्ये देखील दुष्काळ आणि पाण्याचे प्रश्‍न कायम आहेत. हे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी सत्तेत राहणे गरजेचे आहे, असा प्रचार अजित पवार गटाकडून सुरू आहे. तर, अजित पवार भाजपच्या गोटात दाखल झाल्याची नाराजी देखील मतदारांत आहे. त्यामुळे काका-पुतण्याच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांनी प्रचारात रंगत आणली आहे.

मोदी, सितारामन बारामतीत

बारामतीचे कृषी आणि संस्थात्मक विकासाचे मॉडेल पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन या बारामती मध्ये येऊन गेल्या आहेत. श्री. मोदी यांनी ‘मी पवार साहेबांच्या बोटाला धरून राजकारणात आलो’ असल्याचे गौरवोद्गार काही दिवसांपूर्वी काढले होते. मात्र तेच मोदी आता शरद पवार यांनी कृषी विकासासाठी काय केले, असा प्रश्‍न उपस्थित करून राजकीय टीका करत आहेत.

Supriya Sule Sunetra Pawar
Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

इतर तालुक्यांवर भिस्त

बारामतीत शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतदार विभागला गेला आहे. यामुळे किती मतदार कोणासोबत राहतात, हे मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे. इंदापूरचे आमदार दत्ता भरणे आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल (भाजप) हे अजित पवार यांच्या सोबत आहेत. पुरंदरमध्‍ये कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप सुप्रिया सुळे यांच्यासोबत असून, त्यांचे विरोधी शिवसेनेचे (शिंदे गट) विजय शिवतरे अजित पवारांकडे आहेत.

खडकवासल्याचे भाजपचे आमदार भीमराव तापकीर अजित पवार गटाकडे तर आणि भोरचे कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे सुळे गटाकडे आहेत. मात्र थोपटे यांचे प्रतिस्पर्धी कुलदीप कोंडे (शिवसेना शिंदे गट) हे अजित पवार यांच्याकडे आहेत. त्यामुळे बारासमतीसह इतर तालुक्यांतील मतदार कोणाच्या बाजूने उभे राहतात, त्यावरच कोण बाजी मारणार हे निश्‍चित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com