Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात ३९८ कोटी ८ लाखांवर पीककर्ज वाटप

Kharif Season : यंदाच्या (२०२४) खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यात सोमवार (ता. २९) पर्यंत ५७ हजार ६४७ शेतकऱ्यांना ३९८ कोटी ८ लाख ५१ हजार रुपये (४४.६४ टक्के) पीककर्ज वाटप झाले आहे.

Team Agrowon

Hingoli News : यंदाच्या (२०२४) खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यात सोमवार (ता. २९) पर्यंत ५७ हजार ६४७ शेतकऱ्यांना ३९८ कोटी ८ लाख ५१ हजार रुपये (४४.६४ टक्के) पीककर्ज वाटप झाले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १००.२९ टक्के कर्जवाटप करून उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (७५.०८ टक्के) कर्जवाटप आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बँकांचे (१९.३३ टक्के) कर्जवाटप संथ गतीने सुरू आहे.

हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप व रब्बी हंगामात मिळून एकूण १ हजार ४०९ कोटी ९६ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये खरिपातील ८९१ कोटी ७७ लाख रुपये आणि रब्बीतील ५१८ कोटी १९ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.

हिंगोली जिल्ह्यात परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४१ शाखा आहेत. भारतीय स्टेट बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांच्या (व्यापारी बँका) ३८ शाखा, खासगी बँकांच्या ९ शाखा, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या २३ शाखा अशा एकूण १११ शाखा आहेत.

यंदाच्या खरिपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १४६ कोटी ७ लाख रुपये, व्यापारी बँकांना ५६७ कोटी ५३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १७८ कोटी १७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.

सोमवार (ता. २९) अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २९ हजार ३४६ शेतकऱ्यांना १०९ कोटी ६७ लाख ६५ हजार रुपये (७५.०८ टक्के), राष्ट्रीयीकृत (व्यापारी) बँकांनी ९ हजार ४०४ शेतकऱ्यांना १०९ कोटी ७१ लाख ८६ हजार रुपये (१६.३९ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १८ हजार ७४९ शेतकऱ्यांना १७८ कोटी ६९ हजार रुपये (१००.२९ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

सोमवार (ता.२९) पर्यंत जिल्ह्यातील ११ बँकांचे कर्जवाटप अहवाल प्राप्त न झाल्यामुळे कर्जवाटप कमी दिसत आहे. गतवर्षी २९ जुलै रोजी एकूण ४५२ कोटी ११ लाख ९६ हजार रुपये (५१.६७ टक्के) पीककर्ज वाटप झाले होते, असे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT