Parbhani News : यंदाच्या खरीप हंगामात सोमवार (ता. १५) अखेर परभणी जिल्ह्यातील बँकांनी ६७ हजार ५५९ शेतकऱ्यांना ५१८ कोटी ५८ लाख रुपये (३५.२४ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. त्यात ३ हजार ४७९ शेतकऱ्यांना ४७ कोटी ४७ लाख रुपये एवढे नवीन पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
तर ६४ हजार ८० शेतकऱ्यांनी ४७० कोटी ९० लाख रुपये एवढ्या रकमेच्या पीककर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १००.४६ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे (८०.७० टक्के) वाटप आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँका व खासगी बँकाचे पीककर्ज वाटप अद्याप २० टक्क्यांच्या आतच आहे.
या वर्षीच्या खरिपात परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, सहकारी, खासगी मिळून एकूण १७ बँकांना १ हजार ४७० कोटी ९७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांना (व्यापारी बँका) एकूण ९४७ कोटी ८८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला २२७ कोटी ३९ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १७२ कोटी ९४ लाख रुपये, खासगी बँकांना १२२ कोटी ७६ लाख रुपये उद्दिष्टांचा समावेश आहे.
सोमवार (ता. १५) अखेर राष्ट्रीयीकृत बँकांनी १२ हजार ५४७ शेतकऱ्यांना ४० कोटी ९४ लाख रुपये (१४.८७ टक्के) पीककर्ज वाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १७ हजार ४९७ शेतकऱ्यांना १८३ कोटी ५० लाख रुपये (८०.७० टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३६ हजार ३९५ शेतकऱ्यांना १७३ कोटी ७४ लाख (१००.४६ टक्के) कर्ज दिले. खासगी बँकांनी १ हजार १२० शेतकऱ्यांना २० कोटी १९ लाख रुपये (१६.४५ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.
परभणी जिल्हा पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये)
बँक उद्दिष्ट वाटप रक्कम टक्केवारी शेतकरी संख्या
भारतीय स्टेट बँक ६०७.७० १०६.४५ १७.५२ ९४४०
महाराष्ट्र ग्रामीण बँक २२७.३९ १८३.५० ८०.७० १७४९७
जिल्हा सहकारी बँक १७२.९४ १७३.५२ १००.४६ ३६३९५
बँक ऑफ बडोदा ६९.७७ ३.४३ ४.९२ ४२२
बँक ऑफ इंडिया १२.५० ०.५३ ४.२४ ६९
बँक ऑफ महाराष्ट्र ८५.५७ १६.६ १९.५० १२४९
कॅनरा बँक ५०.१४ २.१८ ४.३५ ३८७
सेंट्रल बँक ऑफ इंडिया १२.८३ २.७३ २१.२८ २२६
इंडियन बँक २५.५५ १.३५ ५.२८ १२७
इंडियन ओव्हरसीज बँक ११.०१ १.१० ९.९९ ८६
पंजाब नॅशनल बँक ११.४९ ०.६४ ५.५७ ४८
युको बँक २५.०६ २.७९ ११.१३ ३०८
युनियन बँक ऑफ इंडिया ३६.२६ ३.०५ ८.४१ १८५
अॅक्सिस बँक १३.२६ २.५१ १८.९३ ८
एचडीएफसी बँक ४०.४८ ८.३१ २०.५३ ४२३
आयसीआयसीआय बँक ३१.९५ ७.२६ २२.७२ ४८१
आयडीबीआय बँक ३७.०७ २.११ ५.६९ २०८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.