Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : पीक नुकसानीचे पंचनामे अपूर्णच; शेतकऱ्यांची नाराजी

Heavy Rain crop Loss : अनेक भागांत महसुली कर्मचारी व विमा कंपनीचे प्रतिनिधी पोहोचलेच नाहीत. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या. अधिकारी, लोकप्रतिनिधींचे पाहणी दौरे पूर्ण झाले. परंतु पंचनामे अपूर्णच आहेत. अनेक भागांत महसुली कर्मचारी व विमा कंपनीचे प्रतिनिधी पोहोचलेच नाहीत. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे.

विमा कंपनीकडे नुकसान झाल्यानंतर ७२ तासात ऑनलान तक्रार अनेक शेतकऱ्यांनी नोंदविली आहे. सुमारे २० हजार ऑनलान तक्रारी जळगाव, धुळे जिल्ह्यांतून दाखल झाल्या आहेत. परंतु या तक्रारींवर अंतिम कार्यवाही पाहणी, पंचनामे केल्यानंतर होते.

ती पूर्ण झालेली नाही. काही भागांत विमा कंपनी प्रतिनिधींसमवेत महसुली व कृषी विभागाचे कर्मचारी येत नाहीत. तर काही भागांत महसुली कर्मचारी येतात, पण विमा कंपनीचे कर्मचारी येत नाहीत.

पीकविमा योजनेतून खरिपातील पिकांसंबंधी विमा संरक्षण आहे. पावसाने नुकसानीसंबंधी परतावे दिले जातात. त्यासाठी पाऊस झाल्यानंतर ७२ तासांत तक्रार विमा कंपनीकडे नोंदवायची असते.

अनेक शेतकऱ्यांना ही तक्रार नोंदविताना तांत्रिक किंवा नेटवर्क व अन्य अडचणी आल्या. काही शेतकऱ्यांना मोबाइल हाताळता येत नसल्याने तक्रार नोंदविता आलेली नसल्याचीदेखील माहिती आहे. तर काही शेतकऱ्यांच्या तक्रारीच या पोर्टलवर दाखल होऊ शकल्या नाहीत.

नुकसानीसंबंधी अमळनेर, धरणगाव, चाळीसगाव, भडगाव, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर भागांतून विमा कंपनीकडे सुमारे २० हजारांवर तक्रारी दाखल आहेत.

परंतु त्यावर तत्काळ कार्यवाही करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. महसूल प्रशासनाने अनेक गावांत नुकसानच नाही. पाऊस नव्हता, असा दावाही केला जात आहे. यामुळे शेतकरी नाराज आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT