Crop Damage Survey : मराठवाड्यात ६.६६ लाख हेक्टरचे पंचनामे पूर्ण

Crop Survey Update : एकूण क्षेत्रापैकी ६ लाख ६६ हजार ८५८.६५ हेक्टरवरील शेती पिकांचे पंचनामे आटोपले असल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या एकूण क्षेत्रापैकी ६ लाख ६६ हजार ८५८.६५ हेक्टरवरील शेती पिकांचे पंचनामे आटोपले असल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

या संदर्भात अधिक माहितीनुसार, मराठवाड्यात सर्वसाधारण ४८ लाख ५७,१५२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात ४९ लाख ५४ हजार ८५८ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. पेरणी झालेल्या या क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्रावर सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीने खरिपाची मोठी हानी केली होती. प्राथमिक अहवालाच्या माहितीनुसार मराठवाड्यातील २२ लाख ४८ हजार ४४५ शेतकऱ्यांचे जिरायती बागायत व फळपीक मिळून जवळपास १८ लाख ५ हजार ८६२.२९ हेक्टरवरील शेती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते.

Crop Damage
Crop Damage Survey : पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी

त्यामध्ये १७ लाख ५६ हजार ८८९.२९ हेक्टरवरील जिरायती, २७,८६३ हेक्टरवरील बागायती तर २१ हजार ११० हेक्टरवरील फळपिकांच्या नुकसानीचा समावेश आहे. नुकसान झालेल्या बागायती पिकांच्या प्राथमिक क्षेत्रात छत्रपती संभाजीनगरमधील १३६० हेक्टर, जालन्यामधील ३८२९ हेक्टर, परभणीतील ५५० हेक्टर हिंगोलीतील १७१३९ हेक्टर, नांदेडमधील ४८०८ हेक्टर तर धाराशिव मधील १७७ हेक्टरवरील बागायती पिकांचा समावेश आहे. नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाच्या वतीने प्राप्त झाल्यानंतर पंचनाम्यांना प्रत्यक्ष सुरुवात झाली.

प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ७ लाख १५ हजार ९५८ शेतकऱ्यांच्या ६ लाख ६६ हजार ८५८.६५ हेक्टरवरील शेतीपिकांचे पंचनामे आतापर्यंत आटोपले आहेत. मराठवाड्याची पंचनाम्याची टक्केवारी ३९.६५ टक्के आहे. पंचनाम्यात परभणीत सर्वाधिक ८५.५ टक्के पंचनामे करत आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ हिंगोलीत ६७.३८ टक्के, लातूरमध्ये ३३.८२ टक्के, बीडमध्ये २३.७८ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये २०.५३ टक्के, जालन्यात १५.४३ टक्के, नांदेडमध्ये १३.२६ टक्के तर धाराशिवमध्ये सर्वात कमी केवळ १.२५ टक्के पंचनामे आटोपले आहेत.

Crop Damage
Crop Damage : अकोल्यातील पीक नुकसानीचे पंचनामे तत्काळ सुरू करा

पाच जिल्ह्यांत फळपिकांचे नुकसान

प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रात पाच जिल्ह्यांतील फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील सर्वाधिक २०,४६९ हेक्टर क्षेत्राबरोबरच परभणीतील २७० हेक्टर, हिंगोलीतील ६० हेक्टर, नांदेडमधील २३१ हेक्टर, तर धाराशिवमधील ८० हेक्टर फळपिकांच्या झालेल्या नुकसानीचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

नैसर्गिक आपत्तीत ५३ जणांनी गमावला जीव

१ जून ते ६ सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे ५३ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. शिवाय १६ जण या आपत्तीत जखमीही झाले आहेत. सुमारे १२६९ जनावरांना आपला जीव गमवावा लागला असून त्यामध्ये दुधाळ ४७५ मोठी व ५४८ लहान, ओढकाम करणाऱ्या १९३ मोठ्या व ५३ लहान जनावरांचा समावेश आहे. सुमारे १४ पक्क्या व कच्च्या घरांची पूर्णतः पडझड झाली असून ३८४ पक्क्या घरांची अंशतः तर २४२३ कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे. २७ झोपड्या पडझड वा नष्ट झाल्या असून १८२ गोठ्यांचेही या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

जिल्हानिहाय ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान (हेक्टरमध्ये) व शेतकरी संख्या

जिल्हा नुकसान क्षेत्र शेतकरी

छत्रपती संभाजीनगर १७६९३६.०७ ३१६०५९

जालना २१२५६९.३२ २४५७८४

परभणी. ३५१५७८ ४५९०१२

हिंगोली २८१६७९ २८१६८८

नांदेड ४५१९९३ ५८८२५३

बीड. ११८४२५.८० १०८५३७

लातूर २०६६१४.१० २४२५७२

धाराशिव ६०६७ ६५४०

जिल्हानिहाय पंचनामे झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर २९२६५

जालना ५९८४७.१६

परभणी २२९००७.३६

हिंगोली १९८५१७.५

नांदेड ५८३४३

बीड २७६१५.८३

लातूर ६३६५६.१

धाराशिव ६०६.७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com