Dilip Gawade Agrowon
ॲग्रो विशेष

Divisional Commissioner : दिलीप गावडे यांनी विभागीय आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली

Divisional Commissioner Dilip Gawade : विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी बुधवारी (ता. २६) आपल्या पदाचा कार्यभार प्रभारी विभागीय आयुक्त जगदीश मिनीयार यांच्याकडून स्वीकारला. या वेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त जगदीश मिनीयार यांनी श्री. गावडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी बुधवारी (ता. २६) आपल्या पदाचा कार्यभार प्रभारी विभागीय आयुक्त जगदीश मिनीयार यांच्याकडून स्वीकारला. या वेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त जगदीश मिनीयार यांनी श्री. गावडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी जलसंपदाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, अनंत गव्हाणे, नयना बोंदार्डे, सुरेश वेदमुथा, ॲलीस पोरे, डॉ. सीमा जगताप, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी विभाग प्रमुखांशी संवाद साधला. मराठवाड्यातील शेती, टंचाई तसेच सामाजिक विषयांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. श्री. गावडे हे १९९० मध्ये महसूल विभागात उपजिल्हाधिकारी पदावर रुजू झाले होते.

वाई येथे प्रांत अधिकारी, पुणे येथे राजशिष्टाचार विभागात उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, सातारा येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त, विदर्भात एमआयडीसीचे सीईओ पदावर त्यांनी काम केले आहे.

२००७ मध्ये त्यांना आयएएस पदावर बढती मिळाल्यानंतर गोंदिया जि. प. सीईओ, अहिल्यादेवीनगर येथे मनपा आयुक्त, नाशिक येथे आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त, पर्यटन विभागाचे संचालक व मानवी हक्क संरक्षण विभागाचे सदस्य सचिव या पदावरही त्यांनी काम केले आहे.

मराठवाड्याचे प्रश्‍न समजून घेऊ. शेती व्यवसायावर आधारित सर्वाधिक लोक असल्याने त्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक प्रशासनाच्या व शासनाच्या माध्यमातून करण्यासाठी आपण प्रयत्न करू. याशिवाय सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासही आपले प्राधान्य असेल.
दिलीप गावडे, विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT