Sugar Commissionerate : राज्याच्या साखर आयुक्तपदी डॉ. कुणाल प्रकाश खेमनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या एक एप्रिलपासून ते आपल्या पदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता आहे. विद्यमान आयुक्त अनिल कवडे अद्यापही सेवेत आहेत. येत्या ३१ मार्च रोजी ते निवृत्त होत आहेत.
श्री. कवडे आधी राज्याचे सहकार आयुक्त म्हणून काम पाहात होते. निवृत्तीला अवघे ५० दिवस उरलेले असताना त्यांना अचानक या पदावरून दूर करण्यात आले व साखर आयुक्तपदी नियुक्त केली गेली. त्यामुळे श्री. कवडे यांनी साखर आयुक्तपदाचा पदभार घेतल्यापासूनच आता पुढचा नवा आयुक्त कोण, अशी चर्चा साखर उद्योगात सुरू झाली होती.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, डॉ. खेमनार यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी (ता. १९) उशिरा जारी करण्यात आले. मात्र श्री. कवडे यांचा सेवा कालावधी समाप्त झालेला नसल्यामुळे पुढील दहा दिवस तेच आयुक्त असतील. पुढील काही दिवसांत डॉ. खेमनार व श्री. कवडे यांची अनौपचारिक भेट होईल व एक एप्रिलपासून नवे आयुक्त नियमित कामकाज सुरू करण्याची शक्यता आहे.
नवे आयुक्त डॉ. खेमनार हे छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून त्यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर २०१२ मधील महाराष्ट्र तुकडीतून सेवेत आले. त्यांची नियुक्ती पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.