Jalgaon News: मागील हंगामासारखे यंदाही कापूस पीक तोट्याचे ठरत आहे. कापूस उत्पादकांना दरही हवे तसे किंवा हमीभावाइतके बाजारात मिळाले नाहीत. उत्पादकांना खर्चाच्या तुलनेत पीक परवडले नसून, पूर्वहंगामी किंवा बागायती पिकात यंदाही रोगराई, अतिपावसाने एकरी तीन ते साडेतीन क्विंटल एवढेच उत्पादन हाती आले आहे. .यंदा चांगला उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक्षम कापूस वाण येईल, अशी अपेक्षा होती. पण ती पूर्ण झालीच नाही. खानदेशातील कापूस उत्पादकता प्रतिहेक्टरी सरासरी केवळ ३५० ते ३६० किलो राहील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली..कोरडवाहू कापूस पिकाची स्थिती आणखीच बिकट आहे. त्यात एकरी एक क्विंटल एवढेच उत्पादन खानदेशात अनेक शेतकऱ्यांना हाती आले आहे. खानदेशात सुमारे साडेसात लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. यात सुमारे पावणेदोन लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक होते..CCI Cotton Procurement: दहा हजार शेतकऱ्यांकडून ‘सीसीआय’ला कापूस.देशातही स्थिती बिकटदेशातही कापसाचे उत्पादन सतत कमी होत आहे. यंदा देशातील एकूण कापूस उत्पादन ३०० ते ३१० लाख गाठी (एक गाठ म्हणजे १७० किलो कापूस) एवढे राहू शकते. भारत कापूस लागवडीत जगात अग्रभागी, पण उत्पादनात सतत मागे आहे. भारतात मागील तीन वर्षे कापसाची लागवड सरासरी १२५ लाख हेक्टर एवढी राहिली आहे. पण मागील तीन वर्षांत ३५० लाख गाठींपेक्षा अधिक उत्पादन आलेले नाही..पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा या भागांतील कापसाखालील कमाल क्षेत्र ओलिताखाली आहे. पण तेथेही कापूस उत्पादनाला रोगराई, किडींचा जबर फटका बसला असून, उत्तरेकडून देशात यंदा ४० लाख कापूसगाठी (एक गाठ १७० किलो कापूस) एवढा पुरवठादेखील होणार नाही, अशी स्थिती आहे..कापूस उत्पादन एकरी तीन क्विंटल६८०० (कमाल) रुपये प्रतिक्विंटल या दरानुसार आलेले एकूण उत्पन्न २० हजार ४०० आहे. बागायतदार शेतकऱ्याला एक एकर कापूस पिकात फक्त ३ हजार २०० रुपये एवढा नफा राहत आहे. अनेकांना तोटा आला आहे. कोरडवाहू कापूस उत्पादकाच्या हाती काहीच येताना दिसत नाही..राज्यात समस्या गंभीरदेशात सर्वाधिक ४२ ते ४२ लाख हेक्टरवर कापूस लागवड महाराष्ट्रात केली जाते. पण राज्यात मागील वेळेस व यंदाही अतिपावसाने कापूस पिकास फटका बसला. राज्याची कापूस उत्पादकता यंदाही हेक्टरी प्रतिहेक्टरी ३४५ किलो एवढीदेखील राहणार नाही, अशी स्थिती आहे. दुसरीकडे उत्पादन खर्च मात्र पाच टक्के वाढला. मागील वेळेस सरासरी साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल, असे कापूस दर हाती आले. यंदाही अशीच स्थिती आहे. कापूस उत्पादक तोट्यात आल्याच्या प्रतिक्रिया खानदेशात उमटत आहेत..Cotton Farmer Issue: कापूस वेचणी आणखी महागली.पूर्वहंगामी (बागायती) कापूस उत्पादन व खर्च(सर्व बाबी एक एकरसाठी व रुपयांत)ट्रॅक्टरने नांगरणी : १५०० ते १८००शेत भुसशुभीत करणे (रोटाव्हेटर ) : १२०० ते १३००बियाणे : १००० (एक पाकिटापेक्षा अधिक)खते : ५०००.कीडनाशके : ३००० ते ३२००मजुरी (तणनियंत्रण, खते देणे, कापूस लागवड, फवारणी आदी) : ५ ते ६ हजारकापूस वेचणी मजुरी : ४००० ते ४५००माल वाहतूक व इतर खर्च : १५०० ते २०००कापसाचा एकूण खर्च (किमान): १७ हजार २००(यात शेतकऱ्याचा रोजचा मेहनताना गृहीत धरलेला नाही).लागवडीत घटीचा कलकापूस पीक नुकसानकारक ठरत असल्याने लागवडीत घट होत आहे. देशातील कापसाखालील क्षेत्र २०२२-२४ मध्ये १२९ लाख हेक्टर एवढे होते. २०२४-२५ मध्ये १२५ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली. २०२५-२६ मध्येही कापूस लागवडीत महाराष्ट्रासह अनेक प्रमुख राज्यांत घट झाली. राज्यात सर्वाधिक कापूस लागवड करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील क्षेत्र २०२३-२४ मध्ये ५ लाख ६७ हजार हेक्टर एवढे होते. २०२४-२५ मध्ये जळगावातील लागवड ५ लाख ११ हजार हेक्टर एवढी झाली. तर २०२५-२६ मध्ये जळगावातील कापूस लागवड ५ लाख हेक्टरपेक्षा कमी झाली..पूर्वहंगामी कापूस पिकात एकरी तीन क्विंटल उत्पादन आले. पाऊस व रोगराई होतीच. नोव्हेंबरध्ये पिकात किडींची समस्या वाढली. खासगी खरेदीदारास पोच ६७०० रुपये प्रतिक्विंटल, या दरात कापसाची विक्री धरणगावात (जि.जळगाव) केली. सर्व कापूस उत्पादकांना हमीभाव मिळत नाही.गणेश पाटील, शेतकरी, कठोरा, ता. जि. जळगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.