Mango Flowering: आपल्या रंग, चव आणि गंधाने सर्वांना भुरळ घालणारा मराठवाड्याचा केसर आंबा यंदा चांगलाच आणि एकाच वेळी मोहरला आहे. त्यामुळे पुढील हवामान अनुकूल राहिल्यास यंदाच्या हंगामात वेळेपूर्वी व चांगल्या दर्जाचे केसर आंबा उत्पादन हाती येईल, अशी आशा उत्पादकांना आहे.