Drought Strike Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : चांदवड, देवळा तालुक्यांतील दुष्काळ दिसला नाही का?

Team Agrowon

Nashik News : दोन ते तीन वेळा पेरणी करूनही उभी पिके जळालेली आहेत, असे असतानाही शासनाकडून जाहीर केलेल्या दुष्काळ यादीत चांदवड व देवळा तालुक्यांचा समावेश नसल्याने तालुक्यातील शेतक-यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. चांदवड व देवळा तालुक्यातील दुष्काळ कुणालाचा दिसला नाही का?

असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. चांदवड-देवळा तालुक्यांचे लोकप्रतिनिधी यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने या तालुक्यातील जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे चांदवड व देवळा तालुका दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी(ता. ६) तहसील कार्यालयावर दुष्काळ मोर्चा काढण्यात आला.

चांदवड व देवळा हे तालुके दुष्काळी तालुके असून बहुतांशी गावांची पीक आणेवारी ५० पैशांच्या आत आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. या तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळाची भयानकता बघता, यावर्षी शासनाने तालुक्याकडे लक्ष देऊन हे तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करावेत, अशी मागणी करण्यात आली.

तरी वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करून चांदवड व देवळा तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करण्याकामी उपाययोजना कराव्यात या आशयाचे निवेदन चांदवड तहसीलदार मकरंद कुलकर्णी यांना देण्यात आले. या वेळी शिरीषकुमार कोतवाल, बाजार समिती सभापती संजय जाधव यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

दुष्काळी मोर्चातील प्रमुख मागण्या

कांदा अनुदान वितरणाची प्रक्रिया जलदगतीने राबवून शेतक-यांच्या खात्यावर संपूर्ण कांदा अनुदान वर्ग करावे.

सरसरकट पीकविमा भरपाई मिळावी.

शेतकऱ्यांना १०० टक्के सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.

२०२१ मध्ये व मागील वर्षात अति पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम मिळावी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे १०० टक्के वीजबिल माफ करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी.

चांदवड व देवळा तालुक्यांसाठी पिण्याचे पाणी राखीव ठेवावे.

जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा.

दुष्काळाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात.

कांद्याची अघोषित निर्यातबंदी उठवावी व कांद्यावरील किमान निर्यात मूल्य रद्द करावे. मका ४००० व सोयाबीन ८००० रुपये याप्रमाणे हमीभाव जाहीर करावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT