Onion Market : लासलगाव बाजार समितीत आजपासून १२ दिवस कांद्याचे लिलाव बंद

Lasalgaon APMC Market : लासलगाव बाजार समितीमधील कांदा विभागातील व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेतला आहे
Lasalgaon APMC
Lasalgaon APMCAgrowon

Nashik News : सणासुदीच्या तोंडावर कांदा दर वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टाॅक बाहेर काढला आहे. त्यामुळे मागील महिन्यात उन्हाळी कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल ५३०० रुपये दर मिळत होता. त्यात १८०० रुपये प्रतिक्विंटलची घसरण झाली आहे. लासलगाव बाजार समितीमधील कांदा व्यापाऱ्यांनी आजपासून १२ दिवस लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Lasalgaon APMC
Onion Price : कांदा @ २५ रुपये ; मदर डेअरीच्या सफल आउटलेटवर स्वस्तात विक्री

यंदा माॅन्सूनच्या पावसाने उशीर केल्याने खरीप कांद्याची उशीरा लागवड झाली. त्यात पावसाच्या खंडामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने अद्यापही बाजारात नवीन कांद्याची आवक झाली नाही. त्यामुळे उन्हाळी कांद्याचा चांगला भाव मिळत होता. या कांद्याला सरासरी ५ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. किरकोळ बाजारात हा कांदा ८० रुपये प्रतिकिलोच्यावर पोहोचला. देशांतर्गत बाजार समितीमधील भाव नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. त्याला कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी विरोध केला.

Lasalgaon APMC
Onion Farmer : ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं ; रोहित पवारांचा मोदी सरकारवर हल्ला

त्यात सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांद्याची खरेदी सुरू केली. ऐन दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने बफर स्टाॅकमधून दोन लाख टन कांदा किरकोळ बाजारात आणला आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना १८०० रुपये प्रतिक्विंटलचे नुकसान होत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेली नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून (दि. ७) ते दि. १८ नोव्हेंबर असे 12 दिवस बंद राहणार आहे. याबाबतचे पत्र लासलगाव मर्चंट असोसिएशने बाजार समिती प्रशासनाला दिले आहे. लिलाव बंद असल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर होऊन कांदा कोंडी होऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com