Nashik News : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक अंतर्गत येणाऱ्या नाशिक, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, निफाड, येवला तालुक्यातील समाविष्ट गावांमध्ये ३० जूनपर्यंत प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानांतर्गत अनुसूचित जमातीच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक आणि सामूहिक योजनांचा लाभ देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अर्पित चौहान यांनी माहिती दिली.
या अभियानांतर्गत नाशिक प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आठ तालुक्यातील ३८९ गावांचा समावेश आहे. आदिवासी क्षेत्र आणि समुदायांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाची खबरदारी घेऊन केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ या अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
यामध्ये आदिवासी गावे व कुटुंबांच्या वैयक्तिक आणि सामूहिक विकासासाठी रस्ते, पक्की घरे, पाण्याची व्यवस्था, वीज पुरवठा, अंगणवाडी केंद्र बांधणे हे लाभ देण्याची कार्यवाही पुढील पाच वर्षांत करण्यात येणार आहे.
धरती आबा जनभागिदारी अभियानांतर्गत ३० जूनपर्यंत आयइसी शिबिरांचे आयोजन तालुकानिहाय करून या शिबिरांमध्ये अनुसूचित जमातीच्या नागरिकांना आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, भूमिहीन दाखला, अल्प भूधारक, शिधापत्रिका, एफआरएपट्टा वाटप, जॉबकार्ड, आयुष्यमान भारत कार्ड,
किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड, जनधन बँक खाते, ई-पीक कार्ड, सिकलसेल तपासणी, पीएम आवास योजना, उज्ज्वला गॅस योजना, वीज जोडणी आदी वैयक्तिक लाभ देण्यात येणार आहेत. आदिवासी बांधवांनी या शिबिरांमध्ये सहभागी होत अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चौहान यांनी केले आहे.
या ठिकाणी शिबिरांचे आयोजन
तालुका ठिकाण
इगतपुरी
२६ जून मारुती मंदिर, वाडिवऱ्हे.
सिन्नर
२३ जून शाहा
२५ जून वडांगळी
२६ जून सिन्नर
२७ जून पांगरी बु., पांढुर्ली
३० जून सोनांबे.
त्र्यंबकेश्वर
२३ जून त्र्यंबकेश्वर
२४ जून डहाळेवाडी
२५ जून वेळुंजे
२६ जून हरसुल
२७ जून ठाणापाडा.
दिंडोरी
२६ जून लखमापूर, जऊळके वणी
२७ जून तळेगाव, कसबे वणी
३० जून कोशिंबे
पेठ
२६ जून नगरपंचायत कार्यालय, पेठ.
येवला
२३ जून पाटोदा
२५ जून येवला
२७ जून जळगाव नेऊर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.