Tribal Products: आदिवासी बांधवांची प्रीमियम उत्पादने देशविदेशात मिळणार एका क्लिकवर

Shabari Naturals, E-commerce Launch: शबरीनॅचरल्स डॉट कॉम या नव्या ई-कॉमर्स पोर्टलचे अनावरण आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते नुकतेच झाले.
E-commerce portal unveiled
E-commerce portal unveiledAgrowon
Published on
Updated on

Nashik News: आरोग्यासाठी उपयुक्त अशी आदिवासी बांधवांकडून निर्मित प्रीमियम दर्जाची उत्पादने ‘शबरी नॅचरल्स’ या ब्रॅण्डच्या माध्यमातून अत्यंत कमी कालावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. ही उत्पादने आता देशात तसेच विदेशात एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते shabarinaturals.com या ई–कॉमर्स पोर्टलचे अनावरण मलबार हिल येथील सह्याद्री अतिथिगृह येथे बुधवारी (ता. ९) करण्यात आले.

आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त तथा शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांनी सांगितले, ‘‘शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी शेतकरी उत्पादक कंपन्यांना, वनधन विकास केंद्रांना अत्यंत नाममात्र व्याज आकारून कर्जपुरवठा केला जातो. या आदिवासी शेतकरी बांधवांनी बनविलेल्या प्रीमियम उत्पादनांना बाजारपेठ मिळावी याबरोबरच अनादी कालापासून असलेली त्यांची संस्कृती साजरी केली जावी यासाठी आठ महिन्यांपूर्वी ‘शबरी नॅचरल्स’ हा ब्रॅण्ड तयार केला. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील विविध प्रदर्शनांमध्ये या ब्रॅण्डखालील उत्पादनांची ग्राहकांनी खरेदी करत पसंती दिली आहे.’’

E-commerce portal unveiled
Tribal Development : ‘शबरी’च्या प्रशिक्षणार्थींना ‘आरसेटी’चे बळ

आदिवासी संस्कृती जगासमोर आणण्यासाठी शबरी महामंडळाने सर्वंकष अभ्यास करून गुणावत्तापूर्ण उत्पादने तयार केली आहेत. केवळ या उत्पादनांना चालना न देता त्याचे मार्केटिंग करण्यासाठी आकर्षक असे पॅकेजिंग देखील केले आहे. या पॅकेजिंगच्या माध्यमातून आदिवासींची संस्कृती मांडलेली असून ती ग्राहकांसमोर येत आहे. पॅकेजिंगमध्ये प्रामुख्याने वारली, चित्रकथी आणि गोंडी आर्ट या शैलींचा समावेश करण्यात आलेला आहे, असे बनसोड यांनी सांगितले.

E-commerce portal unveiled
Shabari Tribal Loan Scheme: शबरी आदिवासी विकास महामंडळातर्फे ‘व्यवसायासाठी कर्ज’

बदलत्या काळानुसार तसेच ग्राहकांच्या मागणीनंतर या उत्पादन विक्रीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मची आवश्यकता भासू लागली होती. त्यासाठी महामंडळाने सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर हा ब्रॅण्ड ग्राहकांच्या सेवेसाठी आता उपलब्ध झाला आहे. ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून देश विदेशातील नागरिक आता ही उत्पादने एका क्लिकवर खरेदी करू शकणार आहेत, असे त्या म्हणाल्या. आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, राज्यातील सर्व प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

उत्पादने घरपोच देण्यासाठी इंडिया पोस्टसमवेत करार

ही उत्पादने घरपोच देण्यासाठी ८ जानेवारी रोजी इंडिया पोस्टसमवेत करार करण्यात आला आहे. त्यांच्यामार्फत घरोघरी ही उत्पादने पोहोचणार आहेत. तर यापूर्वी विविध प्रदर्शनांमध्ये सहभाग तसेच व्हॉट्सॲप बिजनेस या माध्यमातून मागणी मिळवून उत्पादनांची विक्री केली जात होती.

...ही उत्पादने मिळणार

शबरी नॅचरल्स या ई–कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोहाच्या फुलांपासून बनविण्यात आलेले सुमधूर मोगी भोग, मोहाच्या बीयांचे तेल, मोहाचे सिरप, साबण, मॉइश्चराझर, लाडू, मध, कुकीज अशा अनेक दर्जेदार उत्पादनांचा समावेश आहे. विशेषत: आदिवासी बांधवांचा कल्पवृक्ष असलेल्या मोहाच्या फुलांपासून वाइन, साबण, मध, लहान मुलांच्या आवडीची कुकीज, लाडू अशा स्वरूपाची तब्बल २१ उत्पादने तयार केली आहेत.

आदिवासी बांधवांची उत्पादने तसेच अनादी कालापासून चालत आलेली आदिवासी बांधवांची संस्कृती ई–कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जगभरात पोहोचणार आहे. महामंडळाचे हे पाऊल नक्कीच पथदर्शी ठरणार आहे.
प्रा. डॉ. अशोक उईके, मंत्री–आदिवासी विकास

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com