Latur News: वाढता उत्पादन खर्च आणि बाजारात मिळणारे कमी दर यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उस्तुरी (ता. निलंगा) येथील शेतकरी महारुद्र शेट्टे यांनी दीड एकरात ६० क्विंटल बटाटा उत्पादन घेतले मात्र त्याना पडलेल्या बाजार भावामुळे नफा तर दूरच ३० हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे..श्री. शेट्टे यांनी दीड एकर क्षेत्रात बटाटा लागवड केली होती. या पिकासाठी मशागत ३ हजार, खत ४ हजार ५००, बियाणे २४ हजार, लागवड २ हजार, अंतर मशागत २ हजार, फवारणी ३ हजार, वाहतूक ८ हजार आणि काढणीसाठी १२ हजार असा मिळून एकूण ५८ हजार ५०० रुपयांचा खर्च झाला. या क्षेत्रातून एकूण ६० क्विंटल बटाटा उत्पादन झाले..Potato Planter Machine: ट्रॅक्टरचलित बटाटा लागवड यंत्र.त्यापैकी मोठ्या आकाराचा १६ क्विंटल बटाटा प्रतिकिलो ८ रुपये दराने विकला गेला, तर मध्यम दर्जाचा ३० क्विंटल बटाटा ५ रुपये किलो दराने विकावा लागला. यातून शेतकऱ्यांना २७ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न मिळाले. मात्र खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने सुमारे ३० हजार ७०० रुपयांचा तोटा झाला आहे. .Crop Losses : धान्य पिकांच्या कापणीनंतर होणाऱ्या नुकसानीची ताजी आकडेवारी उपलब्ध नाही; केंद्रीय मंत्री पासवान यांची लोकसभेत कबुली.याशिवाय १५ क्विंटल बारीक बटाटा अजूनही शेतात पडून असून त्याला बाजारात बेभाव लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नापिकी, दुष्काळ व अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना शेती पिकाच्या वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडत असल्याचे चित्र आहे..बटाटा लागवडीसाठी मोठा खर्च करावा लागतो. मात्र बाजारात दर खूपच कमी मिळत असल्याने खर्चही निघत नाही. सरकारने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना किमान हमीभाव किंवा आर्थिक मदत द्यावी.- महारुद्र शेट्टे ,शेतकरी, उस्तुरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.