Tribal Vaidu: वैदू हा वनौषधीद्वारे सेवा करणारा आरोग्य दूतच

Tribal Healers: ‘पारंपरिक उपचार पद्धती ही भारताची देण असून जंगलातील वनौषधीच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारा गावातला आरोग्य दूत म्हणून वैदूने (ग्राम वैद्य) स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे,
Tribal Vaidu
Tribal VaiduAgrowon
Published on
Updated on

Chandrapur News: ‘‘पारंपरिक उपचार पद्धती ही भारताची देण असून जंगलातील वनौषधीच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारा गावातला आरोग्य दूत म्हणून वैदूने (ग्राम वैद्य) स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे,’’ असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

वन विभागाच्या वतीने सोमवारी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित वैदू संमेलनात ते बोलत होते. या वेळी खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक प्रभुनाथ शुक्ला, उपसंचालक आनंद रेड्डी, कुशाग्र पाठक, सुभाष कासनगुट्टूवार, नामदेव डहाळै, एस. एच. पाटील उपस्थित होते.

Tribal Vaidu
Panpimpari Production : पानपिंपरी उत्पादनासाठी मिळाले गॅप प्रमाणीकरण

जिल्ह्यातील वैदूंसोबत संवाद आणि संपर्क व्हावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, की ग्रामीण भागात आजही वैदूंवर विश्वास आहे. तो समर्पणातून सेवा करतो. वैदूंजवळ असलेल्या ज्ञानाचा फायदा वनऔषधींच्या माध्यमातून जनतेला व्हायला पाहिजे.

Tribal Vaidu
Satpuda Greenery : सातपुड्याची हिरवळ नामशेष होण्याच्या मार्गावर

त्यामुळे आपल्याजवळ असलेले ज्ञान लिखित स्वरूपात ठेवावे. तुमचा अनुभव, तुमचे ज्ञान, तुमच्या कुटुंबांना अवगत करा. वनऔषधीतून उपचार करण्याची पद्धती इतरांनाही सांगा. त्यामुळे भविष्यात वनऔषधी पासून अनेक रुग्ण बरे होऊ शकतात. असे केले तरच पारंपरिक ज्ञान जिवंत राहील.

ज्ञानाचे रूपांतर लिखित स्वरूपात असेल तर तुमच्यानंतर त्याचा फायदा नागरिकांना होईल. जे वैदू किंवा ग्रामवैद्य जंगलातून वनउपज जमा करतो त्यांना मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. वैदूंची उपचार पद्धती आजही महत्त्वाची आहे.

त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्री म्हणून नक्कीच प्रयत्न करू. हे केवळ एक दिवसाचे संमेलन नव्हे तर येणाऱ्या काळात वैदूंना न्याय देण्यासाठी अशा प्रकारच्या संमेलनाचे आयोजन करण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com