Dermatitis Pox Agrowon
ॲग्रो विशेष

Dermatitis Pox : मुलांमधील त्वचारोग कांजिण्या

हा आजार प्रामुख्याने १० वर्षे वयाच्या खालील मुलांना होणारा आहे. संपूर्ण शरीरभर अंगावर फोड / पुरळ आणि खाज असणारा हा आजार फक्त लहान मुलांनाच होतो असे नाही, लहान मुलांसमवेत मोठ्या लोकांना देखील हा आजार उद्‌भवताना दिसून येतो.

टीम ॲग्रोवन

कांजिण्या म्हणजे चिकनपोक्स. (Chickenpox) हा आजार प्रामुख्याने १० वर्षे वयाच्या खालील मुलांना होणारा आहे. (Children Disease) संपूर्ण शरीरभर अंगावर फोड / पुरळ आणि खाज असणारा हा आजार फक्त लहान मुलांनाच होतो असे नाही, लहान मुलांसमवेत मोठ्या लोकांना देखील हा आजार उद्‌भवताना दिसून येतो. एकदा आजार होऊन गेल्यावर पुन्हा आजार होण्याची शक्यता कमी असते.

परंतु आजार होतच नाही असे नाही. यामुळे कांजिण्या या आजाराबाबत लहान मुले विशेषतः अगदी कमी वयाची बालके, प्रतिकारशक्ती कमी असणारी बालके यामध्ये विशेष लक्ष देणे गरजेचे असते. तसेच मोठ्या मुलांना आणि प्रौढ व्यक्तींना कांजिण्या झाल्यानंतर त्यामुळे होणारा त्रासदेखील जास्त असलेला पाहावयास मिळतो.

कांजिण्या म्हणजे नक्की काय?

कांजिण्या हा एक त्वचारोग आहे, जो लहान मुलांमध्ये विशेषकरून आढळतो. यामध्ये १० वर्षे वयाच्या खालील मुलांना हा आजार होतो. या आजारास बळी पडलेली ८० ते ९० टक्के मुले ही दोन वर्षांखालील असतात. या आजारामध्ये संपूर्ण शरीरावर फोड आणि खाज येते.

कांजिण्या होण्याची कारणे

कांजिण्या हा संसर्गजन्य आजार आहे. कांजिण्या हा आजार व्हेरीसोला झोस्टर या विषाणूपासून पसरतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून इतर निरोगी व्यक्तींना हा आजार पसरला जातो. कांजिण्या झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर त्याचा खोकला, शिंका, लाळ, दूषित कपडे किंवा अंगावरील फुटलेल्या फोडांद्वारे हा विषाणू पसरतो.

कांजिण्याची लक्षणे

कांजिण्याची लक्षणे आजाराचा संसर्ग झाल्यानंतर / विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर ४ ते २० दिवसांच्या आत दिसतात. अगदी सुरुवातीला दिसणारे लक्षण म्हणजे सामान्यतः अस्वस्थ असल्याची सामान्य भावना.यासोबत अंगदुखी, ताप, अत्यंत थकवा जाणवणे, चिडचिड वाटणे, भूक न लागणे, जेवण करण्याची इच्छा नसणे, डोकेदुखी अशी लक्षणे दिसतात. यानंतर पुढील एकदोन दिवसांत फोड येण्यास सुरुवात होते.

कांजिण्यांचे तीन टप्पे

पहिल्या टप्प्यात ः खाज सुटणे, फोड येण्यास सुरुवात होणे, गुलाबी किंवा लाल पुरळ/ फोड येणे. एकाचवेळी सुमारे २५० ते ५०० फोड संपूर्ण शरीरावर आलेले दिसतात. काही गंभीर रुग्णांमध्ये हे फोड तोंड, डोळे, गुदद्वार किंवा गुप्तांगांमध्ये होऊ शकतात.

दुसऱ्या टप्प्यात ः पुढील काही दिवसांत, हे फोड द्रवाने भरलेल्या फोडांमध्ये बदलतात. पुढील एक-दोन दिवसांमध्ये ते फोड फुटण्यास सुरुवात होते.

तिसरा टप्पा ः शेवटी या जखमा भरून येण्यास सुरुवात होते. जखमांवर खवले तयार होतात आणि नंतर जखम भरून खवले पडतात. एकाच वेळी फोड येणे, फोड फुटणे, आणि जखमा भरून येणे हे सर्व टप्पे दिसू शकतात. सर्व फोड भरून येईपर्यंत इतर लोकांमध्ये कांजिण्या आजाराचा संसर्ग पसरवला जाऊ शकतो.

कांजिण्या आजाराची लक्षणे बहुतांश वेळा सौम्य असतात. परंतु काही वेळा लक्षणे अधिक तीव्रदेखील असू शकतात. यामध्ये फोड / पुरळ एक किंवा दोन्ही डोळ्यांवर पसरते, फोड खूप लाल, उबदार किंवा कोमल होतात. या वेळी त्वचेचा जंतुसंसर्ग होऊ शकतो. चक्कर येणे, धाप लागणे, उलट्या होणे, ताठ मान, स्नायूंवर नियंत्रण ठेवता न येणे, खूप जास्त ताप असणे, डीहायड्रेशन अशी लक्षणे दिसल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असते.

कांजिण्यांवरील उपचार

बहुतांश वेळा कांजिण्यांवर उपचार करण्याची गरज पडत नाही. फोडांवर जास्त खाज असताना चंदन उगाळून लावावे, दाह आणि खाज कमी होण्यासाठी गुलकंद घ्यावे. इतर त्रासासाठी वैद्यकीय उपचार घ्यावेत.

कांजिण्यांमध्ये घ्यावयाची काळजी

शरीर, त्वचा, चादरी स्वच्छ ठेवाव्यात. खाज जास्त असताना मुले जास्त खाजवतात, त्यांची नखे नीट कापावीत आणि त्यांच्या हाताभोवती पातळ कापड गुंडाळावे. कुटुंबातील एका व्यक्तीला कांजिण्या झाल्या, तर संसर्ग होण्याची शक्यता असलेले आणि संसर्ग न झालेले यांना त्या व्यक्तीपासून दूर ठेवावे. रुग्णांनी वापरलेले साहित्य उकळून, निर्जंतुक करून घ्यावे.

कांजिण्यांमध्ये अंघोळ करताना ः अंघोळीच्या पाण्यात स्वच्छ धुतलेली कडुनिंबाची पाने घालावीत. साबणाचा वापर टाळावा. त्वचा घासणे टाळावे, शरीर नैसर्गिकरीत्या कोरडे होऊ द्यावे किंवा सुती कापडाने पुसून घ्यावे.

कांजिण्यांतील आहार

जास्तीत जास्त द्रव पदार्थांचा समावेश आहारामध्ये करावा. मुगाच्या डाळीचे वरण, तूप, ताज्या फळभाज्या आणि पालेभाज्या याचा आहारात समावेश करावा. ताजा आणि गरम आहार घ्यावा. काळी द्राक्षे, मनुके खावेत.

टाळावयाचा आहार

कांजिण्यांमध्ये शरीरात उष्णता वाढलेली असते. त्यामुळे उष्णता वाढवणारे, पदार्थ पित्तकारक पदार्थ टाळावेत. तिखट, तेलकट, मसालेदार, शिळे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, मांसाहार टाळावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT