Ajit Pawar Meeting  Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar Meeting : 'एआय'चा कृषी आणि सहकार विभागाने वापर करावा; उपमुख्यमंत्री पवारांचे निर्देश

AI In agriculture : यावेळी मातीतील कर्बाचं प्रमाण, मातीचं आरोग्य, तणाचा प्रकार, आणि पीकाचं आरोग्य यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल आणि खर्च कमी होईल, असं अजित पवार यांनी सांगितले.

Dhananjay Sanap

artificial intelligence can be used agriculture : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासह उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) व्यावहारीक वापर करण्यासंबंधीचे सोमवारी (ता.३) निर्देश दिले. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती.

यावेळी मातीतील कर्बाचं प्रमाण, मातीचं आरोग्य, तणाचा प्रकार, आणि पीकाचं आरोग्य यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल आणि खर्च कमी होईल, असं अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, "जगभरात एआय क्रांती घडवत आहे. कृषी क्षेत्रही मागे राहू नये. हवामान बदल, अवकाळी पाऊस, किडरोगांचा प्रादुर्भाव आणि मजूर टंचाईसारख्या आव्हानांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना एआयशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे एआय शेती क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावू शकतं." असंही पवार म्हणाले.

पिकांच्या उत्पादनात वाढ, मजुरी खर्चात बचत, रसायनिक खते व औषधांच्या वापरात कपात, कापणी कार्यक्षमतेत वाढ, रोगनियंत्रणाद्वारे बचत, पुरवठा साखळीतील कार्यक्षमतेत वाढ आणि एकूण खर्चात कपात होणे शक्य होईल.

राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक आणि अमूलाग्र बदल घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

या बैठकीला राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अखिल भारतीय द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष कैलास पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा,

वित्त विभागाचे (व्यय) प्रधान सचिव सौरभ विजय, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, साखर आयुक्त कुणाल खेमनार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. निलेश नलावडे, प्रा. योगेश फाटके, प्रा. तुषार जाधव, प्रा. शरद ताटे उपस्थित होते.

दरम्यान, कृषी विभागाने एआयची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेची बाजू तपासून सहकार विभागासोबत काम करण्याचे निर्देशही अजित पवारांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan : एक ऑगस्टपासून पीककर्ज प्रक्रिया ऑनलाइन

Ujani Dam Water Discharge : उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढवला

Maize Sowing : देशात मका लागवड १५ टक्क्यांनी वाढली

Dragon Fruit Rate : पहिल्या बहरातील ड्रॅगन फ्रूटची विक्री अंतिम टप्प्यात

Heavy Rainfall Maharashtra : मुसळधार पावसामुळे धरणे भरण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT