Soil Health : मातीची काळजी घेतल्यास उत्पादनात होतेय वाढ

Crop Production : मातीची काळजी घेणे आता काळाची गरज झाली आहे. ही बाब हेरून जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये शास्त्रीय पद्धतीने मातीचे नमुने गोळा करण्यात आले.
Soil Health
Soil HealthAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : मातीची काळजी घेणे आता काळाची गरज झाली आहे. ही बाब हेरून जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये शास्त्रीय पद्धतीने मातीचे नमुने गोळा करण्यात आले. गेल्यावर्षी जमिनीतील सेंद्रिय कर्ब ०.५६ टक्के होता.

यात यंदा वाढ झाली असून, ०.७५ टक्क्यावर पोहोचला आहे. शाश्‍वत पद्धतीने जमिनीचे आरोग्य टिकविल्यास उत्पादनात नक्कीच वाढ होते, हे यावरून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात शेतजमिनीची काळजी, आरोग्य नोंदणी तसेच त्याची गुणवत्ता याबाबत काम केल्या जात आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या मृदा विज्ञान व रसायनशास्त्र विभाग तसेच अ‍ॅक्शन फॉर फूड प्रॉडक्शन (एएफपीआरओ) ही सामाजिक संस्था संयुक्तरीत्या जिल्ह्यात माती परीक्षणाच्या दृष्टीने कार्य करीत आहे.

Soil Health
Soil Health : ओळखा जमिनीची सुपिकता कमी होण्याची कारणे

प्रामुख्याने मृदा आरोग्य व उत्पादनात वाढ याकरिता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विविध कृषिमित्रांच्या सहकार्याने मृदेची काळजी घेणे, आरोग्य समजावून, निरीक्षण करणे तसेच अहवालानुसार व्यवस्थापन करण्याबाबत जनजागृती कार्यक्रम घेतल्या जात आहे. जिल्ह्यात नऊ तालुक्यांमध्ये तीस हजार शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ४९० शास्त्रीय पद्धतीने मातीचे नमुने गोळा करण्यात आले आहे.

Soil Health
Soil Health : जमिनीच्या आरोग्यासाठी संवर्धित शेती करावी

जमिनीचे आरोग्य या विषयी परीक्षण करण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत जमिनीतील सेंद्रिय कर्बचे प्रमाण ०.१० टक्क्याने वाढल्याचे परीक्षण अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जमिनीचे आरोग्य टिकवण्यावर लक्ष केंद्रित करून मोहीम राबविण्यास सुरवात करण्यात आली आहे.

जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यासाठी बागायती शेतकऱ्यांना २१० किलो धैंचा या हिरवळीच्या खताचे प्रात्यक्षिक करण्यात आले. योग्य वाढीच्या अवस्थेत जमिनीत गाडून त्याच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केल्या जात आहे. एकंदरीत मातीची काळजी घेतल्या पीक उत्पादनात नक्कीच वाढ होईल, असे परीक्षण अहवालातून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे माती परीक्षण ही आता काळची गरज ठरत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com