PM Kisan Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan Scheme : जिवंत शेतकरी मयत दाखवून, पीएम किसानचा लाभ नाकारला

Agriculture Scheme : शेतकरी पैकेकरी यांनी आतापर्यंत दोन ऑगस्ट २०१९ व ३१ ऑक्टोबर २०१९ असे दोन वेळा सन्मान निधीचा लाभ घेतला.

सुदर्शन सुतार

Solapur News : कळमण (ता. उत्तर सोलापूर) येथील वैजिनाथ सिताराम पैकेकरी हे शेतकरी जिवंत असतानाही त्यांना मयत दाखवून चक्क पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान योजना) पासून वंचित ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत माहिती अशी की, वैजिनाथ पैकेकरी (रा. कळमण, ता. उत्तर सोलापूर) हे पीएम किसानचे लाभार्थी शेतकरी आहेत. १३ जुलै २०१९ रोजी त्यांनी पंतप्रधान सन्मान निधीसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. पैकेकरी यांचा रजिस्टर नंबर-एमएच-२३५२५५५०७ हा आहे. शेतकरी पैकेकरी यांनी आतापर्यंत दोन ऑगस्ट २०१९ व ३१ ऑक्टोबर २०१९ असे दोन वेळा सन्मान निधीचा लाभ घेतला.

मात्र तिसऱ्या हप्त्यावेळी पासून त्यांना मयत दाखवण्यची किमया महसुली विभागाने केली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून महसूल विभागाने अचानकपणे त्यांना मृत असल्याचे दाखवून पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा लाभ देणे बंद केले आहे.

त्यानंतर त्यांनी स्वतः आपण जिवंत असल्याचे सांगूनही आणि अधिकाऱ्यांकडे भेटून तक्रार देऊनही कोणत्याच अधिकाऱ्यांनी त्यांना दाद दिली नाही. या अजब प्रकारानंतरही अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कोणतेच गांभीर्य न बाळगता केवळ टाळाटाळ केली जात आहे, हे विशेष. या प्रकाराबाबत महसूल प्रशासनाशी संपर्क साधला, पण त्यांनी दाद दिली नाही.

मी पीएम किसान योजनेचा लाभार्थी असून, मला दोन वेळा याचा लाभ ही मिळाला. मात्र तिसऱ्या वेळेस लाभ मिळाला नाही. त्यामुळे मी संबंधित महसूल व कृषी विभागात संपर्क साधला. परंतु मला जिवंत असताना चक्क मयत दाखविल्यामुळे निधी बंद केल्याचे समजले. त्यावेळी मला धक्काच बसला. पण त्यानंतरही त्यांनी चूक सुधारुन घेण्याऐवजी माझ्याशी बोलणेही टाळाटाळ करत माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- वैजिनाथ सिताराम पैकेकरी, कळमण, ता. उत्तर सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Policy : कांदा धोरण समितीला मुदतवाढ; वर्षे सरले, तरीही अहवाल नाही

Grape Disease Management: बुरशीजन्य, जिवाणूजन्य करपा नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय

Ladki Bahin Yojana: ९२ लाख लाडक्या बहिणींची नावे वगळली? 'हा तर महिलांचा विश्वासघात', वडेट्टीवारांची टीका

Soybean Crop Management: ‘एल निनो’ परिस्थितीत कोरडवाहू सोयाबीन व्यवस्थापन

Indian Pomegranate Export: अमेरिकेच्या बाजारपेठेत भगव्या डाळिंबाला संधी

SCROLL FOR NEXT