Fodder shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Chara Chawani : सोलापुरात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

Fodder Shortage : राज्यांमध्ये गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे बहुतांश भागात भीषण पाणीटंचाई आणि चाऱ्याची कमतरता आहे.

Team Agrowon

Solapur News : भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यात चारा छावणी सुरू करण्याची मागणी हराळवाडी (ता. मोहोळ) येथील सामाजिक कार्यकर्ते माउली हेगडे यांनी राज्यपाल आणि मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे.

राज्यांमध्ये गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे बहुतांश भागात भीषण पाणीटंचाई आणि चाऱ्याची कमतरता आहे. लोकांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. जनावरांसाठी देखील चारा उपलब्ध होत नाही.

दुष्काळी उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्ह्यात चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू करण्याची मागणी हेगडे यांनी केली आहे. या निवेदनामध्ये हेगडे यांनी म्हटले आहे, की सोलापूर जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे.

जिल्ह्याचा बहुतांश भाग हा शेतीच्या पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणावर अवलंबून आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये पाऊस कमी झाल्याने उजनी धरणामध्ये पाणीसाठा कमी झाला.

त्यामुळे दुष्काळाच्या तीव्रतेमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे, याकडेही हेगडे यांनी लक्ष वेधले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT