Rajapur Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Rajapur Barrage : राजापूर बंधाऱ्याची पाणीपातळी योग्य राखण्याची मागणी

Panchganga River : शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती, नांदणी व हरोली या गावांना पिण्यासाठी व शेती वापरासाठी तर शिरोळ, आगर, कोंडीग्रे व जांभळी या गावांना शेती वापरासाठी पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा होत असतो.

Team Agrowon

Kolhapur News : सध्या तेरवाड बंधाऱ्याच्या कामामुळे व उन्हाळा पूर्व दिवस असल्याने पंचगंगेचा प्रवाह खंडित आहे. त्यातच राजापूर बंधाऱ्याची पाणी पातळी ही योग्य राखली जात नसल्याने नदी काठावरील गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

परिसरातील राजापूर बंधाऱ्याच्या बॅक वॉटरवर अवलंबून असणाऱ्या बावीस गावांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे राजापूर बंधाऱ्याची पाणी पातळी योग्य प्रमाणात राखण्याबाबत आपण संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी मागणी धरणगुत्ती ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, की शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती, नांदणी व हरोली या गावांना पिण्यासाठी व शेती वापरासाठी तर शिरोळ, आगर, कोंडीग्रे व जांभळी या गावांना शेती वापरासाठी पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा होत असतो. या परिसरातील पावसाचे प्रमाण पाहता हा परिसर निम दुष्काळी म्हणून ओळखला जातो.

त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. सध्या पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून पंचगंगेची पाणी पातळी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना, शेती व अन्य पाणी वापरणाऱ्या घटकांना पंचगंगेचे पाणी उपलब्ध होत नाही. तसेच बंधारा दुरुस्तीचे काम मार्चअखेर सुरू राहणार असल्याने सर्वच घटकांना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार आहे.

गेली अनेक वर्षे जानेवारीनंतर पाणीपुरवठा योजनांना कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्याचे बॅकवॉटरचे पाणी उपलब्ध होत असते. या पाण्यामुळे उपरोक्त गावांना स्वच्छ व पुरेसे पाणी उपलब्ध होत असते. पण सध्या राजापूर बंधाऱ्यातील पाणी पातळी योग्य प्रमाणात राखली जात नसल्याने वरील गावांना पाणीपुरवठा होत नाही.

पंचगंगा नदीतील डोहात शिल्लक असलेल्या दूषित पाण्यामुळे नागरिक व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. शेतकऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे राजापूर बंधाऱ्याची पाणी पातळी योग्य प्रमाणात राखल्यास बॅकवॉटरमुळे परिसरातील नागरिक, शेती व जनावरांना पुरेसे पाणी उपलब्ध होऊन त्यांचे प्रश्न सुटणार आहेत. याबाबत संबंधित विभागाला सूचना करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Green Urea : ग्रीन युरिया उत्पादनासाठी केंद्र सरकारच्या हालचाली; पहिला प्रात्यक्षिक प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये होणार

Agro Processing Industries: क्षमता निर्धारणासह प्रकल्प नियोजन

Teak Rising Demand: सागवानाला वाढती मागणी

Farmer Success Story: प्रयोगशील शेतीत रमलेला पवार परिवार

Organic Farming Business: सेंद्रिय शेती उद्योगातील तेल्हारा कंपनी

SCROLL FOR NEXT