
Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ५६.११ टक्क्यांवर आला आहे. दुसरीकडे ७५१ लघु प्रकल्पातील पाणीसाठ्यातही मोठी घट झाली असून त्यामधील पाणीसाठा ४४.१९ टक्क्यांवरच आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
अजून उन्हाळ्याचे तीन महिने जाणे बाकी असताना झपाट्याने घटत असलेला लघु, मध्यम प्रकल्पांसह गोदावरी नदीवरील पाणीसाठा किंचित चिंता वाढवणारा ठरला आहे. मराठवाड्यातील मोठ्या ११ प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७३.६२ टक्क्यांवर आला आहे.
त्यापैकी निम्न दुधनात प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा सर्वात कमी ५५ टक्क्यांवर असून माजलगाव प्रकल्पात ५७ टक्के, विष्णुपुरी मध्ये ६० टक्के निम्न मनारमध्ये ६२ टक्के, सिद्धेश्वर मध्ये ६३ टक्के सीना कोळेगाव मध्ये ६९ टक्के जायकवाडी ७५ टक्के मांजरा, उर्ध्व पैनगंगा, येलदरीमध्ये प्रत्येकी ७९ टक्के तर निम्न तेरणामध्ये सर्वाधिक ८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
१८२ लघु प्रकल्पातील पाणी साठा ४० टक्यांच्या आत
मराठवाड्यातील १८२ लघु प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ४० टक्क्यांच्या आत आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधील ९८ लघु प्रकल्पात ३७ टक्के,जालन्यातील ५७ प्रकल्पात ३५ टक्के तर हिंगोलीतील २७ लघु प्रकल्पात सर्वात कमी ३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
या व्यतिरिक्त बीडमधील १२६ व परभणीतील २२ प्रकल्पात सरासरी ४१ टक्के, धाराशिव मधील २०६ प्रकल्पात ४७ टक्के, नांदेड मधील ८० प्रकल्पात ४६ टक्के,तर लातूर मधील १३५ प्रकल्पात ५४ टक्के उपयुक्त पाणी साठ्याच्या समावेश आहे.
२ लघुप्रकल्प कोरडे ३५ जोत्याखाली
मराठवाड्यातील ७५१ लघु प्रकल्पांपैकी बीड व धाराशिव मधील प्रत्येकी एक मिळून दोन लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत. याशिवाय ३५ लघु प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये जालन्यातील १३, धाराशिवमधील १०, लातूर व परभणी नांदेड मधील प्रत्येकी एक, हिंगोलीतील ३, बीड मधील ६ तर जालन्यातील १३ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय तीन मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखालीच आहे. त्यामध्ये धाराशिवमधील दोन व जालन्यातील एका प्रकल्पाचा समावेश आहे.
झपाट्याने घटताहेत मध्यम प्रकल्प
मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पात ५६ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १६ मध्यम प्रकल्पात ४९ टक्के,जालन्यातील ७ प्रकल्पात ४३ टक्के ,बीडमधील १६ प्रकल्पात ६२ टक्के,लातूर मधील आठ प्रकल्पात ५३ टक्के,धाराशिव मधील १७ प्रकल्पात ६० टक्के ,परभणीतील दोन प्रकल्प ६० टक्के तर नांदेडमध्ये ९ प्रकल्पात ६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.