Hailstorm Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Hailstorm Update : गारपीटग्रस्तांसाठी वीस कोटी ६२ लाखांची मागणी

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात (ता. ११) फेब्रुवारी रोजी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसासोबत अनेक गावांत गारपीट झाली. यामुळे मुखेड, भोकर, धर्माबाद, उमरी, हिमायतनगर या चार तालुक्यांतील जिरायती, बागायती व फळपीक असे एकूण ११ हजार ९११ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

हा अवकाळीचा फटका पाच तालुक्यातील २० हजार ७०० शेतकऱ्यांना बसला होता. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने वीस कोटी ६२ लाख ७३ हजार आठशे रुपयांची मागणी केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली. नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात वातावरणात बदल होऊन दमट वातावरण तयार झाले.

ता. ११ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर जिल्ह्याच्या भोकर, धर्माबाद, उमरी, हिमायतनगर, मुखेड या तालुक्यांत वादळी वारे वाहू लागले. यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसादरम्यानच गारांचा मारा सुरू झाल्याने काढणीला आलेल्या गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, उन्हाळी ज्वारी, चारापिके यांसह बागायती व फळपिकांना फटका बसला.

हातातोंडाशी आलेले पीक अस्मानी संकटामुळे मातीत मिसळल्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

यानुसार केलेल्या पाहणीत जिल्ह्यात २० हजार ७०० शेतकऱ्यांच्या एकूण ११ हजार ९११ हेक्टरचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला दिला होता. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफ अंतर्गत भरपाईसाठी २० कोटी ६२ लाख ७३ हजार आठशे रुपयांची मागणी केली आहे. ही भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा होणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्राने दिली.

गारपिटीमुळे तालुकानिहाय झालेले नुकसान,

मिळणारा निधी (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका बाधित क्षेत्र भरपाई निधी

भोकर १८५ २५ लाख १६ हजार

धर्माबाद ८१५ १ कोटी २८ लाख ९४ हजार

उमरी ७५१९ १४ कोटी १५ लाख ३० हजार

हिमायतनगर २०३३ ५ कोटी ०२ लाख ८८ हजार

मुखेड १३५९ १ कोटी ९० लाख ४५ हजार

एकूण ११९११ २० कोटी ६२ लाख ७३ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT