Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमा प्रतिनिधीकडून शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी

Crop Damage Survey : अंजनगावसुर्जी तालुक्यामध्ये यावर्षी अतिपावसाने पीकपरिस्थिती अतिशय खराब झालेली आहे. संततधार पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत, तर कपाशीची वाढ खुंटली आहे.

Team Agrowon

Amaravati News : अंजनगावसुर्जी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके उद्ध्वस्त झाली. या बिकट परिस्थितीत हादरलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असताना पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी प्रति शेतकरी पाचशेपासून ते हजार रुपयांची मागणी करीत असल्याचे व पैसे स्वीकारत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या बाबत शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

अंजनगावसुर्जी तालुक्यामध्ये यावर्षी अतिपावसाने पीकपरिस्थिती अतिशय खराब झालेली आहे. संततधार पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत, तर कपाशीची वाढ खुंटली आहे. यामुळे पीक उत्पादनामध्ये ४० ते ५० टक्के घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अशातच सोयाबीनची सोंगणी व काढणी सुरू आहे. सोयाबीन झडतीत येत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा अग्रिम द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी शेतकरी संघटनेने मागील आठवड्यात आंदोलनसुद्धा केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन पीकविमा कंपनीने सर्वेक्षण चालू केले. परंतु तालुक्यातील खोडगाव येथील शेतकरी देवानंद टेकाडे यांनी त्यांच्या शेतात झालेल्या नुकसानीची माहिती पीकविमा कंपनीला कळविल्यावर सर्वेक्षणासाठी कंपनीने कर्मचारी पाठविला.

विमा प्रतिनिधीने देवानंद टेकाडे, अमोल टेकाडे, अमोल तुरखडे, सुमित्रा टेकाडे यांच्याकडे हजार रुपयांची मागणी केली. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारही दाखल करून पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

तर दुसरीकडे वनोजाबाग शेतशिवारात शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पीकविमा सर्वेक्षण करणारे कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांपासून पाचशे ते हजार रुपयांची मागणी करीत शेतकऱ्यांना आम्ही दुप्पलमध्ये काम करीत आहोत. आम्ही तुमच्याकडून नाही तर पूर्ण शेतकऱ्यांकडून पैसे घेत आहोत, असे सांगत असल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने या संतापजनक प्रकाराने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT