Nashik News : जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना इतिहासात पहिल्यांदाच पिकाच्या नुकसानीला संरक्षणासाठी विम्यातून खात्यावर सुमारे ८३० कोटी रुपये वितरित झाले आहेत.
पीकविमा काढलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी २५ हजार ते जास्तीत जास्त पाच लाखांहून अधिक रक्कम एकत्रित कुटुंब आणि वेगवेगळे खाते असलेल्यांना मिळाली आहे. गेल्या वर्षी दुष्काळ, अल्प पावसामुळे खरिपाच्या पिकांची पूर्णतः वाट लागली.
शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र शेतातच पिकांचा पालापाचोळा झाल्याने बियाण्यांचा खर्चही निघाला नव्हता. केंद्रीय पथकाने जिल्ह्यात पाहणी करून दुष्काळही जाहीर केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.
मात्र, दुष्काळ जाहीर झाला; पण मदत कधी, याचे उत्तर मिळत नव्हते. किंबहुना, मोजक्या शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम दिल्यावर कंपन्यांनी हात वर केले होते. यंदा पाच-पन्नास नव्हे, तर शंभर वर्षांच्या इतिहासातही विम्याची एवढी मदत मिळाली नसल्याचे शेतकरी सांगतात.
आपत्तीत विमा कंपन्यांच्या मनमानीमुळे वर्षानुवर्षे शेतकरी या लाभापासून वंचितच राहतात. या वेळी मात्र कसर भरून निघाली. विमा योजनेतील पाच लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपयांची विमा रक्कम खात्यात जमा होणार आहे.
असा मिळाला विमा
तालुका शेतकरी रक्कम
मालेगाव ९७ हजार २५२ १४४ कोटी ७० लाख
येवला ७८ हजार ५४८ १२४ कोटी १८ लाख
नाशिक ७ हजार ४०२ १११ कोटी ६४ लाख
नांदगाव ६२ हजार ५५२ १११ कोटी
बागलाण ५६ हजार ५०४ ४७ कोटी ७७ लाख
चांदवड ६१ हजार ६७४ ९७ कोटी ४७ लाख
देवळा ३६ हजार १२७ ४७ कोटी ६८ लाख
इगतपुरी २४ हजार २३० ५१ कोटी ४४ लाख
निफाड ३२ हजार ५७५ ७१ कोटी ९५ लाख
सिन्नर ५३ हजार ०८३ ८१ कोटी ८४ लाख
सुरगाणा ११ हजार ४७१ ४ कोटी १४ लाख
असे आहे संरक्षण..
पीक विमा संरक्षित रक्कम
बाजरी ३३,९१३
मूग २०,०००
उडीद २०,०००
तूर ३६,८०२
सोयाबीन ५०,०००
कपाशी ५९,९८३
मका ३५,५९८
कांदा ८०,०००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.