Agriculture Labor Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Manpower : कृषी क्षेत्रातील कौशल्याधारित मनुष्यबळाला जर्मनीतून मागणी

Agriculture Department : कृषी क्षेत्रातील कौशल्याधारित मनुष्यबळ महाराष्ट्राने पुरवावे, अशी मागणी जर्मनीतून आलेली आहे.

मनोज कापडे

Pune News : कृषी क्षेत्रातील कौशल्याधारित मनुष्यबळ महाराष्ट्राने पुरवावे, अशी मागणी जर्मनीतून आलेली आहे. यासंदर्भात करार करण्यासाठी कृषी खात्याचे प्रधान सचिव आणि आयुक्त जर्मनीच्या दौऱ्यावर गेले आहेत.

जर्मनीतील बाडेन वुटेनबर्गचे राज्याचे मंत्री डॉ. फ्लोरियन स्टेगमन यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, खात्याच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन व प्रभारी कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांना निमंत्रित केले आहे.

त्यामुळे राज्याचे शिष्टमंडळ १५ जूनपर्यंत जर्मनीच्या दौऱ्यावर गेले आहेत. कौशल्याधारित मनुष्यबळ पुरविण्याबाबत या वेळी दोन्ही राज्यांमध्ये सामंजस्य करार होईल. आयुक्त श्री. भागडे यांनी सांगितले, की राज्यात मोठ्या प्रमाणात कौशल्याधारित मनुष्यबळ उपलब्ध आहे.

जर्मनीत मात्र मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडक मनुष्यबळ आमच्याकडे पाठवावे, असे बाडेन वुटेनबर्ग राज्याने सुचविले होते. त्यासाठी एक करार होत असून हा उपक्रम यशस्वी झाल्यास राज्याच्या ग्रामीण व शेती क्षेत्रातील मनुष्यबळाला जर्मनीत संधी मिळणार आहे.

राज्यात माळी, कुक्कुटपालन, रेशीमपालन, दुग्ध व्यवसाय, कृषी शास्त्र अशा विविध कृषी संलग्न व्यवसायांसह आयटीआयशी निगडित अनेक अभ्यासक्रम चालविले जातात. त्यातून तयार होत असलेले कौशल्याधारित मनुष्यबळ जर्मनीसाठी उपयुक्त ठरू शकते. परंतु त्यापूर्वी या विद्यार्थ्यांना आधी जर्मन भाषा शिकवली जाणार आहे.

त्यानंतर मुलांमधील गुणवत्ता व निकड पाहून नोकरी देण्याचे बाडेन वुटेनबर्ग राज्याने ठरविले आहे. श्री. भागडे म्हणाले, की राज्यातून यापूर्वी बाडेन वुटेनबर्गमध्ये गेलेल्या मराठी तरुणांनी कदाचित चांगली सेवा व कौशल्य तेथे दाखवली असावीत. त्यामुळे महाराष्ट्राला प्राधान्य देण्याचे जर्मनीने ठरविले असावे.

पदभार कोणाकडेही नाही

कृषी आयुक्त जर्मनीच्या दौऱ्यावर गेल्यामुळे कृषी आयुक्तालयाच्या प्रशासकीय कामकाजाची सूत्रे कोणाकडे गेली, याविषयी अधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता होती. परंतु आयुक्तांचा दौरा कमी दिवसांचा असल्यामुळे कोणाकडेही पदभार देण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT