Agriculture Department : बाळापूर तालुक्यात कृषी विभागात ५० टक्के जागा रिक्त

Vacancies of Employees in Agriculture Department: कृषी विभागात सुमारे ५० टक्क्यांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीचे वाटोळे झाले आहे. जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरावीत, अशी मागणी केली आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Akola News : अकोला जिल्ह्यातील बाळापूर या तालुक्यात कृषी विभागात सुमारे ५० टक्क्यांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीचे वाटोळे झाले आहे. जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरावीत, अशी मागणी उरळ येथील गोपाल पोहरे यांनी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांच्याकडे केली आहे. याबाबत प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी विभाग वाऱ्यावर

निवेदनात म्हटले आहे, की वर्षभरापासून बाळापूर तालुका कृषी अधिकारी नसल्यामुळे विभागातील कर्मचाऱ्यांना कमालीची कसरत करावी लागते आहे. फक्त २६ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. ५० टक्के पदे रिक्त आहेत. अंदाजे दहा वर्षांपासून २४ कर्मचारी नसल्यामुळे यंत्रणेवर मोठा ताण पडतो आहे.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी आयुक्त गेडाम यांची तडकाफडकी बदली

कृषी सहाय्यकांकडे १६ ते १७ गावांचा अधिभार असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध योजनेच्या लाभांपासून वंचित राहावे लागते आहे. ज्या योजनेचा लाभ मिळतो तो घेण्यासाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही हाल होत आहेत. शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना शासन राबवत असते. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यास शासन अपुरे पडते आहे.

सध्या बाळापूर तालुक्यात तालुका कृषी अधिकारी १, कृषी अधिकारी १, कृषी सहाय्यक १२, अनुरेखक ४, लिपिक १, वाहनचालक १, शिपाई ३, चौकीदार १ आदी पदे रिक्त आहेत. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने अधिकारी, कर्मचारी नियुक्त करावेत. अन्यथा भविष्यात कमी मनुष्यबळामुळे योजनांचा लाभ मिळण्यास विलंब झाल्यास शेतकऱ्यांना घेऊन उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com