Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

Heavy Rain crop Loss : परतीच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन, कपाशी, तूर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Buldana News : परतीच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन, कपाशी, तूर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये अंढेरा महसूल मंडलातील जवळपास सर्वच गावांना पावसाचा तडाखा बसला आहे.

नुकसानग्रस्त क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे पाटील यांनी तहसीलदारांकडे केली.

मागील आठवड्यात सतत पडलेल्या पावसामुळे देऊळगाव राजा तालुक्यामधील अनेक भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अंढेरा महसूल मंडलातंर्गत येणाऱ्या गावांमध्ये शेतीपिकांचे जास्त नुकसान आहे.

काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्याने आणि कपाशीचे बोंडे सडल्याने कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.

पाडळी शिंदे, मेंडगाव, सावखेड नागरे, बायगाव, शिवणीअरमाळ, सेवानगर, अंढेरा या गावातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT